ऑनलाइन आर्थिक फसवणूक ; Investment App मध्ये गुंतवणूक करण्यास सांगून फसवणूक!
Virar Share Market Fraud News : Investment App मध्ये ऑनलाईन गुंतवणुक करण्यास सांगुन केलेल्या फसवणुकीतील 2 लाख 112 रक्कम तक्रारदार यांना परत करण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश
विरार :- Investment च्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर फसवणुकी झाल्याच्या घटना समोर येत आहे. Virar Fraud परंतु शेअर मार्केटमध्ये केलेली गुंतवणूक आणि फसवणूक झालेले रक्कम परत करण्यास पोलिसांना यश आले आहे.मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील कार्यक्षेत्रातील अर्नाळा पोलीस ठाणेचे Arnala Police Station हद्दीतील तक्रारदार गुप्ता यांनी ॲपवर Investment App मध्ये गुंतवणुक करुन दुप्पट रक्कम मिळत असल्याबाबत एका ॲपमध्ये पैसे गुंतवणुक केली. तक्रारदार यांनी एकुण 2 लाख 112 रक्कमेचा भरणा केला. तक्रारदार यांनी गुंतवणुक केलेल्या रक्कमेचा कोणताही परतावा न मिळाल्याने त्यांची फसवणूक झाल्याबाबत पोलीस ठाण्यात Vasai Virar Police Station तक्रार दाखल केले होते. Vasai Latest Crime News
तक्रारदार यांचा तक्रारी अर्ज प्राप्त होताच झालेल्या व्यवहाराची सविस्तर माहिती घेवुन संबंधीत बँकेसोबत तात्काळ पत्रव्यवहार करुन तक्रारदार यांची रक्कम गोठविण्यात आली. या अर्नाळा पोलीस ठाणे तक्रारी अर्जाचे तसेच गुन्हयाचे अनुषंगाने संबंधीत बँकेसोबत वेळोवेळी पत्रव्यवहार करुन तक्रारदार यांची रक्कम वेळीच संशयीत बँक खात्यांमध्ये गोठविण्यात आली होती. त्यानंतर तक्रारदार यांची रक्कम त्यांचे मुळ खात्यात जमा होणेकरीता न्यायालयात वेळोवेळी पाठपुरावा करुन तक्रारदार यांची फसवणुक झालेली एकुण 2 लाख 112 रक्कम न्यायालयाचे आदेशाने तक्रारदार यांचे मुळ खात्यात परत मिळवून देण्यात आलेली आहे. Vasai Latest Crime News
पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील पाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, महिला पोलीस अंमलदार सहाय्यक फौजदार मिलाग्रिस फर्नांडिस, सचिन शेवाळे, पोलीस अंमलदार प्रशांत बोरकर, महिला पोलीस हवालदार माधुरी धिंडे सायबर पोलीस ठाणे यांनी पार पाडली आहे. Vasai Latest Crime News