Online Cyber Fraud : ऑनलाइन फसवणुकीतील 3.6 लाख रुपये परत मिळून देण्यास सायबर पोलिसांनी यश!

Mira Road Telegram Online Fraud News : सायबर चोरट्याने टेलिग्राम टास्क करण्याचे सांगून 3 लाख 6 हजार 501 रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करून सर्व रक्कम तक्रारदाराला परत केली.
मिरा रोड :- वर्क फ्रॉम होम चे अमित दाखवून टेलिग्राम च्या मदतीने विविध टाक्स पूर्ण केल्यास चांगल्या प्रकारे परतावा मिळेल असे सांगितले होते. Mira Road Online Fraud News टास्क पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने 5 लाख 41 हजार 443 रुपयांची गुंतवणूक केली; परंतु गुंतवणूक केलेले आणि टास्क च्या नावाखाली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिसांना तक्रार दाखल केली होती.
मिरा रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या मुधोळकर यांना वर्क फ्रॉम होम च्या नावाचे आमिष दाखवून टेलिग्राम या ॲपद्वारे टास्क देऊन आणि ते टास्क पूर्ण करण्यासाठी पाच लाखावर अधिक रक्कम ऑनलाईन भामट्यांनी घेतली होती परंतु आपली फसवणूक झाली हे लक्षात येतात त्यांनी सायबर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली होती. सायबर पोलिसांनी तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित बँक खात्याचा शोध घेऊन फसवणूकदाराची वेगवेगळ्या बँक खात्यात वळती झाली आहे ती थांबवण्यात झाली आहे. पोलिसांनी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून फसवणूक झालेल्या रक्कमेपैकी तीन लाख 6 हजार 501 रुपये मूळ खात्यात परत मिळवून देण्यास सायबर पोलिसांना यश आले आहे.

पोलीस पथक
अविनाश अंबूरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सायबर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर यांचेसह सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, महिला पोलीस अंमलदार स्नेहल पुणे, पोलीस अंमलदार कुणाल सावळे, विलास खाटीक, महिला पोलीस हवालदार माधुरी धिंडे, प्रविण सावंत सायबर पोलीस ठाणे यांनी पार पाडली आहे.