मुंबई

“राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह” निमित्त मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ-2 यांच्याकडून विद्यार्थी, शिक्षक, रिक्षा चालक, पादचारी यांना केले वाहतुकीच्या नियमाचे पालन करण्याचे केले आवाहन

35 वे रस्ता सुरक्षा अभियान-2025, अंतर्गत मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाकडून वाहतूक शाखा यांच्याकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध मार्गदर्शन

नालासोपारा :- मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांनी आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व परिमंडळाच्या अंतर्गत 35 व्या रस्ता सुरक्षा अभियान-2025 निमित्ताने जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. शंकर इंदलकर (म.पो.से) सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतुक अनुषंगाने परिमंडळ-2 वाहतूक शाखा वसई यांच्याकडून नालासोपारा पूर्व भागातील के एम पी डी हायस्कूल,सेंट विलन्ब्रॉड व सेंट ॲन्थोनी स्कूल येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत लांगी वाहतुक शाखा, वसई, पोलीस उप निरिक्षक महेबुब रिवाज तडवी व वाहतुक शाखेचे अंमलदार यांनी शाळेचे विद्यार्थी, शिक्षक वर्ग यांना वाहतुकीचे नियम, रस्त्यांवर होणारे अपघात टाळणेकरिता शाळेत जाताना-येताना घ्यावयाची काळजी, स्कुलमध्ये येणे-जाणे करिता असलेले शाळेची बस अथवा खाजगी वाहन यांनी मुलांचे सुरक्षिततेच्या दृष्टीने घ्यावयाची काळजी याबद्दल सुचना व मार्गदर्शन करण्यात आले आहे.

पोलिसांच्या वतीने नालासोपारा येथे जनजागृती कार्यक्रम आयोजीत करून नागरिकांना वाहतुक नियम व सुरक्षा या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या.शाळकरी मुलांनी वाहतूक नियम जनजागृतीमध्ये सहभाग घेतला. परिमंडळ-2 वाहतुक विभागातर्फे रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त रिक्षाचालक आणि पादचारी नागरिकांना वाहतूक नियम व सुरक्षेच्या अनुषंगाने सर्व सूचना दिल्या गेल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0