Nalasopra police Returned Stolen Phone:: मोबाईल परत मिळाल्यामुळे तक्रारदारांनी तुळींज पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत
नालासोपारा :- 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हरवलेले लाखोंचे रुपयाचे मोबाईल फोन परत मिळवून देण्यास पोलिसांना Nalasopra Police Station यश आले आहे.मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला, की तो परत मिळण्याची शक्यता कमी असते. मात्र, तुळींज पोलिसांनी हरवलेले आणि चोरीला गेलेले मोबाईल शोधून ते मूळ मालकांना स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून परत मिळून दिली आहे. मात्र, तुळींज गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिसांनी अंदाजित चार लाख रुपये किंमतीचे 30 मोबाईल फोनचा शोध घेऊन तक्रारदार आणि मूळ मालकांना ते परत केले आहेत.
पोलिसांनी 2 ते 3 महिन्यांपूर्वी हरवलेल्या, गहाळ झालेल्या मोबाईलची माहिती घेत विशेष मोहीम राबवून तांत्रिक कौशल्यावर तपास करत चोरी गेलेले मोबाईल हस्तगत केले. गेलेला मोबाईल परत मिळेल, ही आशाही अनेकांनी सोडून दिली होती. त्यामुळे हरवलेला मोबाईल मिळाल्याचा आनंद नागरिकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत होता. मोबाईल परत मिळाल्यामुळे तक्रारदारांनी तुळींज पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत.
पोलीस पथक
पौर्णिमा चौगुले-श्रींगी पोलीस उप आयुक्त, परीमंडळ-2 वसई, उमेश माने-पाटिल सहाय्यक पोलीस आयुक्त, तुळींज विभाग, तुळींज पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर, पोलीस निरीक्षक सुधिर चव्हाण, पोलीस निरीक्षक जितेंन्द्र पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटिकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल पवार, सहाय्यक फौजदार शिवानंद सुतनासे, पोलीस हवालदार आनंद मोरे, उमेश वरठा, राजेंद्र जाधव, आशपाक जमादार, पांडुरंग केंद्रे, पोलीस शिपाई छपरीबन, राहुल कदम, शशिकांत पोटे तसेच पोलीस उपायुक्त कार्यालय परिमंडळ-2 नेमणुकीतील पोलीस हवालदार बागुल, पोलीस शिपाई अमोल बर्डे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…