Om Prakash Chautala Death: हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचे निधन!
Om Prakash Chautala Death: हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांनी गुरुग्राम येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.
ANI :- इंडियन नॅशनल लोक दलाचे प्रमुख आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचे Om Prakash Chautala Death शुक्रवारी (20 डिसेंबर) निधन झाले. गुरुग्राम येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 89 वर्षांचे होते. चौटाला हे चार वेळा हरियाणाचे मुख्यमंत्री होते.
2 डिसेंबर 1989 रोजी ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आणि 171 दिवस या पदावर राहिले. यानंतर ते 12 जुलै 1990 रोजी मुख्यमंत्री झाले आणि पाच दिवस मुख्यमंत्री राहिले.त्यानंतर 22 मार्च 1991 रोजी ते पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि 15 दिवस राहिले. 24 जुलै 1999 रोजी ओमप्रकाश चौटाला पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसले आणि 2 मार्च 2000 पर्यंत राहिले. त्यानंतर त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. म्हणजे 2005 पर्यंत ते मुख्यमंत्री राहिले.
ओमप्रकाश चौटाला यांचे वडील चौधरी देवी लाल हे दोनदा हरियाणाचे मुख्यमंत्री होते. 21 जून 1977 रोजी ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आणि सुमारे दोन वर्षे ते या पदावर राहिले. त्यानंतर 20 जून 1987 रोजी ते मुख्यमंत्री झाले आणि दोन वर्षे 165 दिवस या पदावर राहिले.
सध्या चौटाला कुटुंबाची तिसरी पिढी हरियाणाच्या राजकारणात आहे. आजकाल चौटाला कुटुंब दोन गटात विभागले गेले आहे. ओपी चौटाला यांचे पुत्र अजय सिंह चौटाला यांनी जननायक जनता पार्टी (जेजेपी) स्थापन केली आहे. त्यांचा दुसरा मुलगा अभयसिंह चौटाला त्यांच्यासोबत राहिला. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आयएनएलडी आणि जेजेपी या दोन्ही पक्षांना मोठा धक्का बसला.