Uncategorized
Ola Accident News : ओला इलेक्ट्रीक स्कुटीला झालेल्या अपघातात 1 ठार 1 जखमी
पनवेल : ओला इलेक्ट्रीक स्कुटीला झालेल्या अपघातात स्कुटीवरील 1 ठार तर त्याचा सहकारी जखमी झाल्याची घटना पनवेलजवळील जुना मुंबई-पुणे हायवे वरील अमरधाम समोरील ओव्हर ब्रीजजवळ कळंबोली ते पळस्पे जाणाऱ्या रस्त्यावर घडली आहे. Panvel Ola Accident News
सदर रस्त्यावरुन ओला इलेक्ट्रीक स्कुटी घेवून चालले असताना सदर गाडीचा अपघात होवून या अपघातात मनिष अशोक शेळके (26 रा. पनवेल) हा गंभीररित्या जखमी होवून मयत झाला आहे व त्याचा सहकारी आकाश जमादार (26) हा जखमी झाला आहे. त्याला उपचारार्थ नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. Panvel Ola Accident News