OBC Reservation : ओबीसी नेत्यांच्या उपोषण स्थळी विरोधी पक्षनेते, थेट मुख्यमंत्र्यांना फोन… मुख्यमंत्र्यांकडून दिले आश्वासन
OBC Reservation ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाच्या स्थळी राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार याची उपस्थिती
जालना :- ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघामारे यांचं जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे उपोषण सुरु आहे.विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे उपोषणस्थळी दाखल झाले.ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणस्थळी यांची भेट घेतली आहे .दोन्ही नेत्यांचा उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी उपोषणस्थळाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला. विजय वडेट्टीवार यांनी एकनाथ शिंदे यांना उपोषणस्थळी सरकारचं शिष्टमंडळ पाठवण्याची विनंती केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपण उद्या मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ पाठवू, असं आश्वासन विजय वडेट्टीवार यांना दिलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचा फोनवरील संवाद
विरोधी पक्षनेते :- सीएम साहेब, मी आता उपोषणस्थळी आलो आहे. आमच्या ओबीसी नेत्यांचं उपोषण सुरु आहे. मंत्री अतुल सावे यांनी फार काही सकारात्मक चर्चा केली नाही. कृपया तुम्ही दोन मंत्र्यांना इथे पाठवा. कारण इथे हजारोंच्या संख्येने फार मोठा जनसमुदाय आहे. तुम्ही त्यांच्या भावना समजून घ्या.
मुख्यमंत्री : लक्ष्मण बाके आणि त्यांचे सहकारी यांना म्हणावं, तब्येतीची काळजी घ्या. ओबीसींना कुठेही नुकसान होणार नाही. त्यांचं कारण कुठेही डॅमेज होणार नाही. याची खबरदारी घेतली आहे. ओबीसी आरक्षणाबाबतची आपली याआधी जी भूमिका होती तीच भूमिका आजही आहे.
विरोधी पक्षनेता :- माझी एक विनंती आहे, दोन मंत्री किंवा सरकारचं शिष्टमंडळ उपोषणस्थळी पाठवा. उपोषणकर्ते आणि ओबीसी समाजाची जी मागणी आहे. सगेसोयरेबाबतची जी भूमिका आहे, त्याबाबत तुम्ही आश्वासन द्या. लेखी स्वरुपात आश्वासन द्या. सगेसोयरे सुप्रीम कोर्टात टीकणार नाही, असं तुमचे मंत्री गिरीश महाजन हे सुद्धा म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री : मी उद्या सरकारचं शिष्टमंडळ उपोषणस्थळी पाठवतो. ते त्यांच्याशी चर्चा करतील.
राज्यात ही सर्व परिस्थिती चिघळली. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य, हे राज्य शाहू, फुले, आंबेडकर यांचं राज्य, पण या पुरोगामीत्वाला धक्का लावून जातीय विष पेरण्याचं काम सुरु केलं. समाजाची मते घेण्यासाठी अनेक राजकारण्यांनी मोठी आश्वासने देवून समाजाला भडकावण्याचं काम केलं. समाज एकमेकाविरुद्ध उभे होतील, अशी परिस्थिती निर्माण केली गेली. आज जे सर्व चालू आहे ते सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आमच्या हक्काचं आरक्षणाच्या संरक्षणाबाबत भीती निर्माण झाली”, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.