नुजत सलमान मुल्लाने केला रमजान चा रोजा (उपवास) पुर्ण
कळंब प्रतिनिधी :- सध्या मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरु आहे. या महिन्यात महिनाभर उपवास धरत अल्लाहची इबादत करत असतात. इस्लाममध्ये कलमा, नमाज, रोजा, जकात, हज हे पाच प्रमुख तत्व आहे. यात सात वर्षांनंतर रोजा ठेवणे बंधनकारक आहे. रमजान महिन्यात मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात रोजे (उपवास) करतात..
कळंब येथील सात वर्षीय नुजत सलमान मुल्ला हिने आपल्याला देखील रोजा धरावयाचा आहे, असा हट्ट आपल्या आई-वडिलांकडे केला. यंदाचा रमजान महिना कडक उन्हाळ्यात आला आहे, म्हणून आई-वडील तीला नकार देऊ लागले.मात्र नुजत काही ऐकेना आणि नुजतच्या जिद्दीपुढे आई-वडिलांनी हार मानत रोजा करण्याची परवानगी दिली तर नुजतने देखील पुर्ण दिवसभर काहीही न खाता-पिता नमाजसह रोजा पूर्ण केला.
नुजतने गेल्या वर्षी देखील अगदी कमी वयात पहिलाच रोजा धरला होता. आज देखील तिचा रोजा पूर्ण झाल्याने तीचे आई, वडिल,मुस्लिम बांधवाकडून, मौलाना, धर्मगुरु, नातेवाईकांकडुन अभिनंदन व कौतुक केले जात आहे.
नुजत ही कळंब येथील धाराशिव वार्ता 24 न्युज चे संपादक आणि व्हाईस ऑफ मिडीया डिजिटल विंगचे तालुका कार्याध्यक्ष सलमान मुल्ला यांची मुलगी आहे.