कळंब:(प्रतिनिधी) दि.१२/१२/२०२४ रोजी व्हॉइस ऑफ मीडिया कळंब तालुका यांच्या वतीने २०२४ निवडणुक काळात मोलाची जबाबदारी पार पाडत पूर्ण वेळ देऊन केलेल्या कामाचे कोठेतरी कौतुक व्हावे या संकल्पनेतून कळंब- धाराशिव २०२४ विधानसभेच्या निवडणुका यशस्वीपणे पार पाडणारे निवडणूक अधिकारी, उपविभागीय अधिकारी संजय पाटील व कळंब चे तहसीलदार हेमंत ढोकले यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .त्याचप्रमाणे कळंब पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक रवी सानप यांचा कळंब व्हॉइस ऑफ मीडिया वतीने पुष्पगुच्छ व्हॉइस ऑफ मीडियाचे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी व्हाईस ऑफ मीडियाचे राज्य कार्यवाहक अमर चोंदे कळंब व्हाइस ऑफ मीडियाचे कार्याध्यक्ष रामरतन कांबळे, उपाध्यक्ष शिवप्रसाद बियाणी ,प्रसिद्धीप्रमुख दीपक माळी, येरमाळा येथील व्हॉइस ऑफ मीडियाचे दीपक बारकुल, दत्तात्रेय बारकुल, सुधीर लोमटे, बालाजी बारकुल, संतोष बारकुल ,सचिन बारकुल, कळंब येथील सलमान मुल्ला, राहुल गाडे, राजेंद्र कांबळे, आधी व्हॉइस ऑफ मीडियाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…