मुंबई

Nitesh Rane : पुणे हिट अँड रन केस प्रकरणी सुप्रिया सुळे गप्प का ? आमदार नितेश राणे

•भाजपचे आमदार Nitesh Rane यांनी खासदार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या Supriya Sule यांना प्रश्न उपस्थित केले आहे

मुंबई :- रविवारी झालेल्या हेट अँड रन केस प्रकरणी आता भाजपाकडूनही आरोपत्यारोप करण्यास सुरुवात झाली आहे. गेले तीन दिवस ही हिट अँड रन प्रकरण चांगलेच गाजले आहेत. यामधील अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहात पाठवण्यात आले असून त्याच्या वडिलांनाही अटक केली आहे. या घटनेत अनेक राजकीय नेते असल्याचा आरोप प्रत्यारोप एकमेकांवर करत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांचा आणि बांधकाम व्यवसायिक अग्रवाल यांच्या जवळचा संबंध असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता. भाजपही उतरले असून भाजपा कडून थेट सुप्रिया सुळे यांच्यावरच निशाणा साधला आहे.देवेंद्र फडणवीसांचा कायम राजीनामा मागणाऱ्या सुप्रिय सुळे गप्प का? त्यांचा अग्रवाल कुटुंबांशी संबंध आहे का? असा सवाल उपस्थित करत भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आरोप केला आहे. तसेच आरोपीचे वकील हे शरद पवार यांचे निकटवर्तीय आहेत असा दावाही नीतेश राणे यांनी केला आहे.

सुप्रियाताई सुळे या सर्व प्रकरणात गप्प का?

आज प्रसार माध्यमांशी बोलतांना नीतेश राणे यांनी गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, “पुणे प्रकरणी शरद पवार गटाकडून कोणती प्रतिक्रिया का व्यक्त होत नाही? प्रत्येक गोष्टीवर देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागणाऱ्या सुप्रिया सुळे गप्प का आहेत? अग्ररवाल आणि त्यांच्या कुटुंबाचे काही संबंध आहेत का? आरोपीचे वकील हे शरद पवार यांचे निकटवर्तीय असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. देवेंद्र फडणीसांनी आयुक्तालयात बसून अतिशय स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्या मुलावर कडक कारवाई सुरू आहे. आता सुप्रियाताईंनी त्या गप्प का आहेत ते आम्हाला सांगावे. त्यानंतर खूप रहस्य बाहेर येतील”, असे म्हणत नीतेश राणे यांनी निशाणा साधला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0