ठाणेमुंबई
Trending

Nitesh Rane Vs Waris Pathan : नितेश राणे आणि वारिस पठाण यांच्यात थेट ‘धमक्यांची’ जुगलबंदी; अहिल्यानगरमध्ये राजकीय वातावरण तापले

Nitesh Rane Vs Waris Pathan : मस्जिदमध्ये घुसून मारणार’ या विधानावर वारीस पठाण आक्रमक; राणे म्हणाले, ‘ही तर नसबंदीवाली पिलावळ’

मुंबई :- एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या अहिल्यानगरमधील जाहीर सभेत, एमआयएमचे नेते वारीस पठाण यांनी भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नितेश राणे यांनी केलेल्या एका विधानावरून वारिस पठाण यांनी थेट धमकीवजा भाष्य केल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

वारीस पठाण नेमकं काय म्हणाले?

अहिल्यानगरमधील सभेत बोलताना वारीस पठाण यांनी नितेश राणे यांचा उल्लेख ‘नेपाळी’ असा करत, राणेंच्या ‘मस्जिदमध्ये घुसून मुस्लिमांना मारणार’ या विधानावर आक्षेप घेतला. पठाण म्हणाले की,”मस्जिदमध्ये घुसून मुस्लिमांना मारणार असे नितेश राणे म्हणतात. पण तो दोन पायावर येतील मात्र स्ट्रेचरवर जातील. आम्ही कुणाला भीत नाही. आम्ही संविधानाचा आदर करतो आणि मर्यादा पाळतो. राणे हे द्वेष पसरवण्याचे काम करतात. त्यांना मंत्री बनवलं आहे. तरीही ते अशी विधाने करत असतात.”

नितेश राणे यांचे तिखट प्रत्युत्तर

वारीस पठाण यांच्या या टीकेला नितेश राणे यांनी अत्यंत तिखट शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी वारीस पठाण यांना जागा आणि वेळ कळवण्याचे खुले आव्हान दिले आहे.

राणे यांचे आव्हान: “जागा आणि वेळ कळवा किंवा मस्जिद निवडा. मी तिथे येतो, धमक्या देऊ नका, तुम्हाला माहिती आहे नितेश राणे काय चीज आहे. मी आधीच म्हटलं की भुंकणारी कुत्री चावत नसतात. ही तर नसबंदीवाली पिलावळ आहे.”

“राज्यातील वातावरण खराब करायचं नाही. आमचं सरकार सभेची परवानगी देतं आहे, म्हणून बोलू शकता, नाहीतर मस्जिदीच्या भोंगेयातून बोलावं लागलं असतं.”

अहिल्यानगरच्या नामकरणावरूनही नितेश राणे यांनी एमआयएमवर टीका केली. “भोकने वाले कुत्ते काटते नही, ही जी हिंदीत म्हण आहे, याचं उत्तम उदाहरण कालची सभा होती. तुम्ही एकाबाजूला म्हणता आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानतो, कायदा-सुव्यवस्था मानतो. पण दुसऱ्याबाजूला महाराष्ट्र सरकारने अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यानगर केलं, औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केलं, ते तुम्हाला मान्य नाही. हे काय तुमच्या अब्बाचं पाकिस्तान, इस्लामाबाद आहे का?” असा सवाल राणेंनी उपस्थित केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0