Nitesh Rane : यशश्री शिंदे हत्या प्रकरणावरून आमदार नीतेश राणे संतापले “ईंट का जवाब पत्थर से..”

Nitesh Rane On Yashshree Shinde Murder यशश्री शिंदेच्या हत्येनंतर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. आज भाजप नेते नितेश राणे त्यांच्या कुटुंबीयांना भेटायला जाणार आहेत.
मुंबई :- नवी मुंबईतील उरण रेल्वे स्थानकाजवळील झुडपात 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी अनेक पथके तयार केली आहेत. यशश्री शिंदे असे या तरुणीचे Yashshree Shinde नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, यशश्री शिंदे ही बेलापूर येथे काम करायची. यशश्री यांच्या निधनावर भाजप नेते नीतेश राणे Nitesh Rane यांनी संताप व्यक्त केला आहे.
भाजप नेते नितेश राणे आज सायंकाळी यशश्री कुटुंबीयांच्या घरी भेट देणार आहेत. सायंकाळी आरोपींना आणण्याचे नियोजन असून, त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.नितेश राणेंचा ‘एक्स’ वर इशारा देत म्हणाले की,ईंट का जवाब पत्थर से..जय श्री राम..
नवी मुंबई येथील कार्यालयातून अर्ध्या दिवसाच्या रजेवर गेल्यानंतर शुक्रवारी दुपारी 3.30 ते 4.30 च्या दरम्यान यशश्रीची हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस पथक या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहे.मृताच्या वडिलांनी या हत्येसाठी अन्य समाजातील व्यक्तीवर आरोप केला असून त्याला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. संतप्त कुटुंबीयांनी सांगितले की, 2019 मध्ये त्या व्यक्तीविरुद्ध यशश्रीचा छळ केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती आणि त्यामुळेच त्यांच्या मुलीची हत्या करण्यात आली होती.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन ‘लव्ह जिहाद’विरोधात कठोर कायदा करण्याची मागणी केली.’एक्स’ वरील पोस्टमध्ये, त्यांनी म्हटले आहे की त्यांनी स्थानिक आमदार महेश बालदी यांच्यासह पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली आणि दोषींना लवकर अटक करण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत ‘लव्ह जिहाद’विरोधात कायदा करण्याची मागणी केली.