Nitesh Rane : ‘ईव्हीएम म्हणजे प्रत्येक मत मुल्लाच्या विरोधात’, मंत्री नितेश राणे यांचे वादग्रस्त विधान!
Nitesh Rane Latest News : मंत्री नितेश राणे यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला. हिंदू समाजाने एकदिलाने मतदान केले हे सत्य विरोधी पक्षांना पचनी पडत नसल्याचे ते म्हणाले.
सांगली :- मंत्री नितेश राणे Nitesh Rane यांचे वादग्रस्त वक्तव्य पुन्हा समोर आले आहे. ते म्हणाले की ईव्हीएम म्हणजे ‘प्रत्येक मत मुल्लाच्या विरोधात आहे’. ते म्हणाले, ‘हो आम्ही ईव्हीएम आमदार आहोत पण ईव्हीएम म्हणजे प्रत्येक मत मुल्लाच्या विरोधात आहे’. नितेश राणे हे माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे Narayan Rane यांचे पुत्र आहेत.
मत्स्य व बंदरे मंत्री राणे म्हणाले की, महाराष्ट्रातील सर्व विरोधी पक्ष ईव्हीएमच्या नावाने ओरड करत आहेत. सांगलीतील हिंदू गर्जना सभेत बोलताना ते म्हणाले, “ते ईव्हीएमवर दोषारोप करत आहेत. हिंदू समाजाने एकजुटीने मतदान केले आहे, हे त्यांना पचनी पडलेले नाही.”
काही दिवसांपूर्वी नितेश राणे यांनीही वादग्रस्त विधान केले होते. केरळमधील दहशतवादी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना मतदान करतात, असे ते म्हणाले होते. केरळसाठी त्यांनी ‘मिनी पाकिस्तान’ असा शब्दप्रयोग केला.
शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नितेश राणेंच्या वक्तव्यावर जोरदार प्रहार करत भाजपवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “नितेश राणेंनी संविधानावर हात ठेवून शपथ घेतली आहे. हिंदूंना मुस्लिम बनवण्यासाठी त्यांनी काही लोकांना कामावर ठेवले आहे.”