क्राईम न्यूज

Nitesh Rane : भाजपा आमदार नितेश राणे यांची होणार पोलीस चौकशी…

Disha Salian Case: दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे Nitesh Rane यांची मुंबई पोलिसांकडून Mumbai Police होणार चौकशी, आत्महत्या नसून घातपात असल्याचा नितेश राणे यांचा दावा

मुंबई :- भाजपाचे आमदार नितेश राणे Nitesh Rane यांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. दिशा सालियन Disha Salian Case आत्महत्या प्रकरणी भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी असा दावा केला होता की, दिशा सालियन यांची आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा नितेश राणे यांनी नागपूरच्या हिवाळी Nagpur Winter Session अधिवेशनात केला होता. Mumbai Crime News

तसेच, सालियन मृत्यूप्रकरणी चौकशी करा अशी मागणी ही नितेश राणे यांनी केली होती. नितेश राणे यांनी आपल्याकडे पुरावा असल्याचा दावा अधिवेशनाच्या काळात गेला होता ‌.दरम्यान, आता या प्रकरणी चौकशी होणार आहे. मुंबईपोलिसांनी आमदार नितेश राणे यांना चौकशीसाठी हजेरी राहण्याची नोटीस बजावली आहे.महाविकास आघाडी सरकार काळात दिशा सालियन हिचा मृत्यू झाला होता. Mumbai Crime News

दिशा सालियन यांचे नेमकं प्रकरण काय?

दिशा सालियान या अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या व्यवस्थापक होत्या. 8 जून 2020 रोजी मुंबईतील घराच्या बालकनीमधून खाली पडून दिशा सालियान हिचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येची नोंद केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यूपूर्वी दिशाने आपल्या लंडनमधील एका मैत्रिणीला फोन केला होता. आपल्या मैत्रिणीशी बोलताना दिशा थोडी चिंतेत वाटत होती. कामाचा लोड जास्त असल्याचे तिने आपल्या मैत्रिणीला सांगितले होते. त्यानंतर थोड्याचवेळात तिचा होणारा नवरा रोहन याने दिशा ज्या खोलीत राहात होती त्या घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र दिशा त्या खोलीमध्ये नव्हती. त्याने खिडकीतून खाली पाहिले असता दिशा पडलेली दिसली.या प्रकरणाचा तपास सीबीआय देखील करत आहे. अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात हे प्रकरणही तपासण्यात आले. दिशाचा मृत्यू झाला त्यादिवशी ती नशेत होती आणि तोल गेल्याने छतावरून खाली पडून तिचा मृत्यू झाला असे सीबीआय तपासात समोर आले आहे. दरम्यान दिशा सालियान प्रकरणात राजकीय वर्तुळातूनही अनेक आरोप करण्यात आले आहेत. Disha Salian Case Latest Update

vivek

Share
Published by
vivek

Recent Posts