Nitesh Rane and Nilesh Rane : महायुतीतील ‘धर्म’ विसरणाऱ्यांना नीतेश राणेंचा टोला; बंधू नीलेश राणेंच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला वाद म्हणजे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या दोन पुत्रांमधील संघर्ष. Nitesh Rane and Nilesh Rane भाजपचे मंत्री नीतेश राणे आणि शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांच्यातील शीतयुद्धाने आता सोशल मिडियावर थेट उडी घेतली आहे.
नीतेश राणे यांनी नुकत्याच एका पोस्टद्वारे आपल्या भावाला – आमदार नीलेश राणे यांना – ‘युती धर्मा’ची आठवण करून दिली. याच पोस्टमध्ये त्यांनी एका कार्यकर्त्याच्या व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रीनशॉट शेअर करत महायुतीतील इतर घटक पक्षांतील कार्यकर्त्यांना धमकावणे हा “अयोग्य प्रकार” असल्याचं स्पष्टपणे नमूद केलं.
या आधीही नीतेश राणे यांनी धाराशिवच्या भाषणात भाजपचा वरचष्मा अधोरेखित करत मुख्यमंत्रीपदाचा दावा फडणवीसांकडे असल्याचं ठामपणे सांगितलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना नीलेश राणे यांनी युतीत वागणुकीचे भान ठेवण्याचा सल्ला दिला होता. आता मात्र हे वादविवाद पुन्हा उफाळून आले असून, सोशल मिडियाच्या मैदानात राणे बंधू पुन्हा आमने-सामने आले आहेत.या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांनीही या दोघांनाही समज दिल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. मात्र नीतेश राणे यांनी अद्याप यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.राज्याच्या राजकारणात महायुतीतील अंतर्गत कुरबुरी उघडपणे समोर येत असल्याने, या ‘राणे विरुद्ध राणे’ प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…