देश-विदेश
Trending

Nitesh Kumar : नितीश कुमार आज 10 व्यांदा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ; पाटणाच्या गांधी मैदानावर भव्य समारंभ

Nitesh Kumar Taking 10th Time Oath Ceremony : बिहार विधानसभा निवडणुकीत NDA चा दणदणीत विजय; सम्राट चौधरी भाजपचे नेते, पीएम मोदी, अमित शाह राहणार उपस्थित

ANI :- बिहार विधानसभा निवडणूक Bihar Vidhansabh (2025) मध्ये एनडीएच्या (NDA) दणदणीत विजयानंतर आज (20 नोव्हेंबर) पाटणा येथील गांधी मैदानावर मुख्यमंत्री शपथ ग्रहण समारोहाची भव्य तयारी करण्यात आली आहे. या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, अनेक केंद्रीय मंत्री, तसेच एनडीएशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.Bihar Oath Ceremony Latest News

शपथग्रहण सोहळ्याची तयारी खूप मोठ्या उत्साहाने करण्यात आली आहे. बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल यांनी सांगितले की, अशा प्रकारचा शपथविधी समारंभ पहिल्यांदाच होत असून, उत्सवपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. बिहारभरातून जवळपास 2 ते 3 लाख मतदार या समारंभासाठी उपस्थित राहतील, असा अंदाज आहे.

गांधी मैदानात सकाळी 11:30 वाजल्यापासून शपथग्रहण कार्यक्रमाला सुरुवात होईल. नितीश कुमार आज (गुरुवार) 10 व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यापूर्वी, 18 नोव्हेंबर 2025 रोजी बिहार विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या एनडीए विधायक दलाच्या बैठकीत नितीश कुमार यांची नेता म्हणून निवड करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी राजभवनात जाऊन आपला राजीनामा सोपवला आणि सरकार स्थापनेचा दावाही केला होता.

बुधवारी भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत सर्वानुमते सम्राट चौधरी यांची भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली, तर विजय कुमार सिन्हा यांची उपनेते म्हणून निवड झाली. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील या नवीन सरकारमध्ये भाजपचे नेते महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0