Nilesh Rane VS Nitesh Rane : महायुतीत फडणवीस समर्थक वक्तव्यानंतर शिवसेना आमदारांचा असंतोष उफाळला
मुंबई :- राज्यातील महायुतीतून एकसंधतेचे चित्र दाखवले जात असले तरी अंतर्गत कुरबुरी पुन्हा एकदा समोर येत आहेत. यावेळी वादाच्या केंद्रस्थानी आहेत खुद्द सत्ताधारी पक्षांचे दोन बंधू – मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे. Nilesh Rane VS Nitesh Rane
नितेश राणे यांनी नुकतेच भाजपच्या वतीने एक ठाम विधान करत म्हटले की, “राज्यातील खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत. हे सर्वांनी लक्षात ठेवायला हवे.” या वक्तव्यानंतर त्यांच्या मोठ्या भावाने – शिवसेना आमदार निलेश राणे यांनी थेट सोशल मीडियावरुन प्रत्युत्तर देत आपला रोष व्यक्त केला.
“नितेशने बोलताना विचार करावा. आपण एकत्र बसलो तेव्हा मी काही बोललो नाही, पण प्रत्येक वाक्य कुणाच्या फायद्याचे होईल हे लक्षात घेऊनच बोलले पाहिजे,” असा सज्जड इशारा निलेश राणेंनी दिला.
या दोघांमधील हा ‘भाऊ-भाऊ’ संवाद म्हणजे महायुतीतील आंतरिक ताणतणावाचं लक्षण मानलं जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागत असतानाच, सत्ताधाऱ्यांमध्येच अशी उघड वादावादी होणे, भाजप व शिंदे गटाच्या नात्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…