•भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावर ‘बनावट जात प्रमाणपत्रा’चा आरोप, निलेश राणेंकडून पुरावे सादर
सिंधुदुर्ग :- मालवण नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजप (BJP), शिंदे सेना (Shinde Sena) आणि ठाकरे सेना (Thackeray Sena) यांच्यात मोठी चुरस असताना, या निवडणुकीत माजी आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ‘स्टिंग ऑपरेशन’ करत राजकीय भूकंप घडवला आहे.
निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा खोत (Shilpa Khot) यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. खोत यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा दावा राणे यांनी केला असून, या आरोपाच्या पुष्टीसाठी त्यांनी काही पुरावेही (Evidence) सादर केले आहेत. राणे यांच्या या ‘स्टिंग’मुळे मालवणच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे.
राणे यांनी यावेळी नमूद केले की, शिल्पा खोत यांनी जनतेची दिशाभूल केली आहे आणि त्याबद्दल त्यांनी माफी मागावी. खोत या समाजसेविका असल्याचा दावा करत असल्या तरी, या प्रकरणाने त्यांच्या उमेदवारीवर आणि प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.विशेष म्हणजे, आरोप करताना राणे यांनी भाजपच्या कोणत्याही मोठ्या नेत्यावर किंवा पदाधिकाऱ्यावर टीका करण्याचे टाळले. मात्र, निवडणुकीच्या ऐन तोंडावर झालेल्या या गौप्यस्फोटामुळे मालवणमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…