Nilesh Rane : भाजपाचे माजी खासदार निलेश राणे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश, हाती धनुष्यबाण
Nilesh Rane Joined Shivsena Group : निलेश राणे यांच्या प्रवेशाच्या दरम्यान पिता भाजप खासदार नारायण राणे आणि भाऊ विद्यमान आमदार भाजप नितेश राणे ही उपस्थितीत
सिंधुदुर्ग :- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे महायुतीच्या महामेळाव्यात भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. Nilesh Rane Joined Shivsena यावेळी त्यांच्या हाती धनुष्यबाण देत त्यांचे पक्षात स्वागत केले. निलेश राणे यांच्या पक्षप्रवेशादरम्यान नारायण राणे आणि नितेश राणे यही उपस्थित होते. पहिल्यांदाच असा प्रवेश पाहिल्याचे म्हटले जात आहे. निलेश राणे यांच्या येण्याने कोकणात शिवसेना अधिक भक्कम झाल्याचे असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहे.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
खासदार नारायण राणे यांनी निलेश यांच्या शिवसेना प्रवेशासाठी होकार दिल्याबद्दल आभार मानले, तसेच त्यांनी जिथून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली त्या शिवसेनेत निलेशचा प्रवेश झाल्याने एक वर्तुळ पूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली. निलेश राणे यांच्या पक्षप्रवेशामुळे कोकणात महायुती अधिक भक्कम झाली असून ज्या कुडाळ शहराने राणे साहेबांना 26 हजारांचे मताधिक्य मिळवून दिले ते आता 52 हजार झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
शिवसेना वाचवण्यासाठी दोन वर्षापूर्वी उठाव केला आणि त्याला 50 आमदारांनी साथ दिली आजही ते सर्व आमदार माझ्यासोबत असल्याचा सार्थ अभिमान असल्याचे यावेळी मत व्यक्त केले. आमच्यावर टीका करणारे आज मला मुख्यमंत्री करा करा म्हणत दारोदारी भटकत आहेत, मात्र यांचा चेहरा मित्रपक्षांना चालत नाही तो महाराष्ट्राला कसा चालेल असे मत व्यक्त केले.
राज्यातील सरकार हे सर्वसामान्य जनतेचे सरकार असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असो, लेक लाडकी लखपती योजना असो, महिलांना एसटीमध्ये 50 टक्के सवलत असो किंवा शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या अनेक योजना असो असे कायम सर्वसामान्य जनतेला न्याय देणारे निर्णय घेतले असल्याचे नमूद केले.
कोकणचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न आम्ही केला. कोकणात अनेक उद्योग आणले. दिघी बंदराच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक होत आहे. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगाने पूर्ण व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न केले. तसेच कोकणातील प्रवास जलदगतीने व्हावा यासाठी मुंबई – सिंधुदुर्ग ऍक्सेस कंट्रोल रस्ता तयार करत असून त्यांचा डीपीआर आणि टेंडर प्रक्रिया सुरू असल्याचे याप्रसंगी सांगितले. त्यामुळे कोकणवासीयांच्या आयुष्यात सुखाचे क्षण यावे यासाठी महायुती सरकार प्रयत्नशील असल्याचे यासमयी स्पष्ट केले.
त्यामुळे आगामी निवडणुकीत निलेश राणे, नितेश राणे, दीपक केसरकर आणि किरण सामंत या महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन मोठ्या संख्येने उपस्थित कोकणवासीयांना केले.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, शिवसेनेचे राजापूर मतदारसंघातील उमेदवार किरण सामंत, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे तसेच शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी आणि आरपीआय महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते.