Nilesh Lanke PA Attack : नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांच्या पीएला जबर मारहाण, भाजपाकडून राक्षसी विजय साजरा केल्याचा आरोप

निलेश लंके यांच्या समर्थकावर झालेल्या मारहाणींवर भाजपने त्या चित्रा वाघ यांची संताप व्यक्त करणारी प्रतिक्रिया
अहमदनगर :- नगर लोकसभेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या निलेश लंके यांनी विजय मिळवला. त्यांच्या विजयाचा जल्लोष करताना निलेश लंके यांचे कट्टर समर्थक तसेच त्यांचे पीए म्हणून ओळखले जाणारे राहुल झावरे यांना जबर मारहाण भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्याचे आरोप केला जात आहे. या घटनेवर भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांच्याकडून आता संताप जनक प्रतिक्रिया समोर आली आहे. एका गर्भवती महिलेवर आणि तिच्या मातोश्रीवर शिवीगाळ करत जमावासह हल्ला केल्याचा आरोप वाघ यांच्याकडून करण्यात आला आहे.
भाजपने नेत्या चित्रा वाघ आपला ट्विटमध्ये म्हणतात की
ये जंगलराज नही चलेगा…आम्हाला निवडणुकीत आलेला पराभव आम्ही स्वीकारला मात्र शरद पवार गटाचे काही पदाधिकाऱ्यांनी त्यांचा विजय साजरा करण्याचा राक्षसी पॅटर्न दाखवून दिला…
पारनेरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचे कट्टर समर्थक राहुल झावरे यांनी राक्षसीपणे आपला विजय साजरा करण्यास सुरुवात केली. हाती दहा-पंधरा कार्यकर्त्यांना घेऊन महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा प्रचार करणाऱ्यांवरती हल्ला सुरू केला. यांच्या डोक्यात सत्ता इतकी गेली की उन्मत्त झालेल्या या राहुल झावरेने पानबंद यांच्या घरात घुसून एका गर्भवती महिलेवर आणि पानबंद यांच्या मातोश्रींवर शिवीगाळ करत जमावासह हल्ला केला…
या नराधमाला कायदा तर शिक्षा देईलच मात्र नवनिर्वाचित खासदार लंके आणि यांची नेता मोठ्ठया ताई या हरामखोर झावरेला शिक्षा देणार का पाठीशी घालणार हे पहावं लागेल. म्हणतात ना आलेलं यश पचवता आलं पाहिजे आणि मिरवता देखील आला पाहिजे. पण महविकास आघाडीच्या डोक्यात सत्ता जाऊ लागली….
पण त्यांचा माज जय शिवरायांच्या पावनभूमीत सहन केला जाणार नाही…झावरे सारख्या औरंग्याच्या औलादिंना या जिजाऊच्या लेकीच धडा शिकवतील…