•निलेश लंके यांनी गुंडा गजा मारणे यांच्या भेटीवर दिले स्पष्टीकरण, कार्यकर्त्यांची भेट घेताना अपघाती भेट
पुणे :- अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांच्या एक व्हिडिओ जोरात व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओमध्ये कुख्यात गुंडा गजा मारणे यांच्याकडून निलेश लंके यांचे स्वागत केले जात आहे. त्यानंतर निलेश लंके यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. या सगळ्या घडामोडीवर निलेश लंके यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
खासदार निलेश लंके यांचे स्पष्टीकरण
मी दिल्लीवरुन आलो. माझे पवार नावाचे सहकारी होते. त्यांचे कर्करोगाच्या आजाराने निधन झाले. त्यांच्या नातेवाईकांची भेट झाल्यानंतर आम्ही परत निघालो. त्यावेळी त्या भागातील आमचा राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी प्रविण धनवे यांच्या घरी गेलो. त्याच्या घरुन निघाल्यानंतर मारणे यांच्या घराजवळ आम्हाला चार सहा लोकांनी थांबवले. त्यांनी चहा पिण्यासाठी बोलवले. आम्हाला तोपर्यंत कोणाची काहीच पार्श्वभूमी माहीत नव्हती. त्यावेळी माझा सत्कार करण्यात आला. तोपर्यंत गजानन मारणे कोण हे मला माहीत नव्हते. नंतर दोन तासांनी संबंधित व्यक्ती माहिती कळाली. तो एक अपघात होतो. कळत न कळत चूक झाली.
अमोल मिटकरी यांनी केली होती टीका
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या मुद्यावरून नीलेश लंके यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. शरद पवार गटाचे खासदार नीलेश लंके यांनी लोकसभेत केलेल्या मदतीच्या मोबदल्यात गुंड गजा मारणेची भेट घेतली का? गजा मारणेने बारामती व नगरम्ध्ये शरद पवार गटाला मदत केली का? पार्थ पवारांनी मारणेची भेट घेतल्यानंतर अजित पवारांनी त्यांची चांगलीच कानउघाडणी केली होती. आता शरद पवार गटही नीलेश लंके यांची कानउघाडणी करणार का? असा सवाल अमोल मिटकरी यांनी या प्रकरणी उपस्थित केला होता.
निलेश लंकेची खरा चेहरा जनते समोर ; उमेश पाटील
अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी खासदार निलेश लंकेवर जोरदार हल्ला केला. समाजसेवक म्हणून मिरवणारे खासदार निलेश लंके हे गजानन मारलेला भेटले. त्यामुळे त्यांची खरी प्रतिमा राज्यासमोर आली आहे. इतकेच नाही निलेश लंकेचे कार्यकर्ते एमआयडीसीमधून कशा पद्धतीने खंडणी गोळा करतात हे सर्वांना माहिती आहे, असा दावा उमेश पाटील यांनी केला.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…