Nilesh Lanke : नवनिर्वाचित चर्चेत राहिलेले खासदार निलेश लंके यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची घेतली भेट
विजयानंतर Nilesh Lanke मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट, दिल्लीला शपथविधी घेण्यापूर्वी घेतली भेट
मुंबई :- लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासूनच अतिशय चर्चेत राहिलेले निवडणूक म्हणजेच सुजय विखे पाटील आणि निलेश लंके यांची निलेश लंके यांच्या विजयानंतर ते मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले होते. उद्या दिल्लीला शपथविधी करीत आणि निलेश लंके जाणार आहेत पूर्वीच निलेश लंकेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.निलेश लंके यांच्या स्वागतासाठी मातोश्रीबाहेर स्वागताचे बॅनर झळकले होते. या बॅनरवर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान शिवसैनिक म्हणून निलेश लंके यांचा उल्लेख करण्यात आला होता. निलेश लंके यांच्या प्रचारात शिवसेना ठाकरे गटाचा मोठा वाटा होता. त्यामुळे आज नगर जिल्ह्यातील शिवसैनिकांसोबत मातोश्रीवर जाऊन लंके यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
निलेश लंके उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर पत्रकारांची संवाद साधताना म्हणाले की, मातोश्रीवर जाऊन आदरणीय उद्धवजी ठाकरे यांचे आशीर्वाद घेतले.याखेरीज आम्हा सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय शिवसेनाप्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत जाऊन त्यांना वंदन केले.मी लहान असताना साहेबांनी मला डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला होता. त्या प्रसंगाची अतिशय उत्कट व भावनिक आठवण यानिमित्ताने झाली.
नवा महाराष्ट्र घडविणारे दोन साहेब अर्थात बाळासाहेब आणि आदरणीय पवारसाहेब अशा महान व्यक्तीमत्वांचे मला सतत आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभले. उद्धवजी ठाकरे साहेबांनी अतिशय आपुलकीने विचारपूस करुन विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी नगर जिल्ह्यात महाविकास आघाडीचे सर्व आमदार येणाऱ्या विधानसभेला निवडून आणणार असा शब्द उद्धवजींना दिला. हि अतिशय आनंददायी भेट होती. शिवसेनाप्रमुखांनी दिलेल्या लोकसेवेच्या शिकवणी पासून किंचितही ढळू नये यासाठीची असीम ऊर्जा या भेटीतून मिळाली.
बाळासाहेब ठाकरे यांचं एक वाक्य आठवतं, 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण. बाळासाहेबांची प्रेरणा घेऊन मी प्रवास माझ्या राजकारणाचा सुरू केला होता. शिवसेनेत शाखाप्रमुख, गटप्रमुख, तालुकाप्रमुख अशी सगळी पदं मी भूषविली. मी खासदार म्हणून निवडून आलो, याचा उद्धव ठाकरे यांनासुद्धा खूप आनंद झाला. महाविकास आघाडीच्या एवढ्या जागा निवडून आल्यामुळेही ते समाधानी आहेत, असे लंके यांनी सांगितले.