पुणे

Nilesh Lanke : खासदार निलेश लंके यांचे गुंडा गजा मारणे यांच्याकडून स्वागत, वाद चिघळण्याची शक्यता

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके वादाच्या भोवऱ्यात, निलेश लंके यांनी कुख्यात गुंडा गजा मारणे यांची घेतली भेट

पुणे :- पुणे दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी कुख्यात गुंडा गजा मारणे यांची भेट घेतली आहे. गजा मारणे यांच्याकडून खासदार निलेश लंके यांचे स्वागत करण्यात आले आहे. निलेश लंके यांच्या भेटीनंतर वाद चिघळण्याची शक्यता दिसून येत असून निलेश लंके आता नवीन वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.यापूर्वी अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी गजा मारणेची भेट घेतली होती. त्यानंतर मोठा गदारोळ झाला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पार्थ पवार याला फटकारले होते, असे अजिबात घडता काम नये, असे बजावले होते.

अहमदनगर लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांना निलेश लंके यांनी पराभूत केले होते. या निवडणुकीत निलेश लंके यांना 6 लाख 24 हजार 797 मते मिळाली. सुजय विखे यांना 5 लाख 95 हजार 868 मते मिळाली होती. चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत 28 हजार 929 मतांनी निलेश लंके यांचा विजय झाला

गजा मारणे कोण आहे?
गजानन मारणेचं मुळ गाव मुळशी तालुक्यात आहे. कुख्यात गुंड गजानन मारणे उर्फ गजा मारणे हा मारणे टोळीचा म्होरक्या आहे. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे. पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणामध्ये गजा मारणे याला अटक झाली होती. या खून प्रकरणात न्यायालयाने त्याला शिक्षाही दिली होती. त्यानंतर गजा मारणे तीन वर्ष पुण्यातील येरवडा कारगृहात होता. मारणे आणि मोहोळ टोळीचा पुण्यात दबदबा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0