Nilesh Lanke : नीलेश लंके यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी उपस्थित राहणार
•भारतीय जनता पक्षाच्या वतीने विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके यांची लढत होणार आहे
अहमदनगर :- लोकसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या वतीने नीलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता नीलेश लंके यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी हे उपस्थित राहू शकतात. नीलेश लंके यांनी स्वतः या संबंधी माहिती दिली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख अद्याप निश्चित करण्यात आली नसली तरी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येणार असल्याचे नीलेश लंके यांनी सांगितले आहे. Nilesh Lanke
अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यात म्हणजे 13 मे रोजी मतदान होणार आहे. तर उमेदवारी अर्ज भरण्यास 25 एप्रिल पासून सुरुवात होणार आहे. या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या वतीने विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्या विरोधात शरद पवार गटाच्या वतीने आमदार नीलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आमदार नीलेश लंके यांनी अजित पवार गटाला सोडचिट्टी देत शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. Nilesh Lanke
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी स्वाभिमानी जनसंवाद यात्रा काढली आहे. या यात्रेचा उद्या समारोप होणार आहे. या कार्यक्रमानिमित्त अहमदनगर मध्ये शरद पवार, आदित्य ठाकरे, बाळासाहेब थोरात आदी महाविकास आघाडीमधील महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. नीलेश लंके यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शरद पवार हे पहिल्यांदाच अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. Nilesh Lanke