Nilesh Lanke Meet Rakesh Kishor : ‘संविधानाचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी आलो’; खासदार निलेश लंकेंकडून दिल्लीत राकेश किशोर यांची भेट
ANI :- सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सोमवारी (6 ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयात बूट फेकण्याचा प्रयत्न करणारे 71 वर्षीय वकील राकेश किशोर यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी दिल्ली येथे भेट घेतली आहे. या भेटीनंतर बोलताना लंके यांनी या कृतीचा शांततापूर्ण मार्गाने निषेध करण्याचा आणि आरोपी वकिलाला संविधानाचे महत्त्व समजावून सांगण्याचा उद्देश स्पष्ट केला.
भेटीमागचा उद्देश काय?
खासदार निलेश लंके यांनी वकील राकेश किशोर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि संविधानाची प्रत भेट म्हणून देण्याचा प्रयत्न केला. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचे संविधान निर्माण केले. संविधानाचे संरक्षण करण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाची आहे.”
ते पुढे म्हणाले, “भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याबाबत जो प्रकार घडला, तो एका व्यक्तीचा अवमान नसून संपूर्ण देशाचा अवमान होता. जे कृत्य घडले, त्याचा शांततेच्या मार्गाने निषेध करण्यासाठी मी आंबेडकरांचा फोटो आणि संविधानाची प्रत घेऊन येथे आलो आहे.”
राकेश किशोर यांच्याकडून घडलेली घटना ‘संकुचित आणि मनुवादी विचारांमधून’ घडली आहे. त्यांना कुठेतरी संविधानाचा विसर पडला आहे. त्याची त्यांना पुन्हा जाणीव करून देण्यासाठी मी इथे आलो आहे, असे निलेश लंके यांनी स्पष्ट केले.
राकेश किशोर यांच्यावर कठोर कारवाई
सरन्यायाधीश भूषण गवई यांनी वकील राकेश किशोर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यास नकार दिला असला तरी, त्यांच्यावर अनेक स्तरांवर कारवाई करण्यात आली आहे:
बार असोसिएशनची कारवाई: सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशन (SCBA) ने वकील राकेश किशोर यांचे तात्पुरते सदस्यत्व रद्द केले आहे. तसेच, त्यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.
गुन्हा दाखल: ऑल इंडिया अॅडव्होकेट्स असोसिएशनचे अध्यक्ष भक्तवचल यांच्या तक्रारीवरून बंगळुरूमधील विधान सौधा पोलीस ठाण्यात राकेश किशोर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…