
Nilesh Ghaiwal attack: एका कुस्तीपटूने नीलेश घायवळवर हल्ला चढवला
पुणे :- भूम तालुक्यातील आंदरूड गावात ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रे निमित्ताने भरवलेल्या कुस्ती स्पर्धेत हा प्रकार घडला आहे.Nilesh Ghaiwal attack कुस्ती सुरू असतानाच अचानक एक कुस्तीपटू धावत आला अन् त्याने नीलेश घायवळवर हल्ला चढवला.
अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड गावचा पैलवान असल्याची माहिती मिळाली. घायवळ याला मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल जाला आहे. या व्हिडिओमध्ये दिसतंय की, एका पैलावानाने घायवळच्या कानाखाली मारली. त्यानंतर हा पैलवान घायवळला आणखी मारहाण करण्याच्या बेतात होता. मात्र, घायवळसोबत असलेले काही जण पैलवानावर तुटून पडले. त्यांनी या पैलवानाला चांगलाच चोप दिला. या घटनेमुळे कुस्ती स्पर्धेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
गुंड निलेश घायवळ कोण आहे?
नीलेश घायवळ हा गजा मारणेच्या टोळीत गुंड म्हणून काम करायचा. त्याच्यावर पुण्यात हत्या, हत्येचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणे, मारामारी करणे, परिसरात दहशत पसरवणे यासारख्या गुन्ह्यांची नोंद आहे. पुण्यातील कोथरुड परिसरातील सुतारवाडीत नीलेश घायवळची दहशत होती. मात्र गजा मारणेशी बिनसल्यावर मारणे गँगने घायवळवर दोनदा हल्ले केले. त्याचे प्रत्युत्तर घायवळ टोळीने दिले. अखेर दत्तवाडीत गुंड सचिन कुडलेची नीलेश घायवळ आणि साथीदारांनी रस्त्यात पाठलाग करुन फिल्मी स्टाईलने हत्या केली. कुडलेच्या हत्येनंतर घायवळसह 26 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली. 2019 मध्ये नीलेश घायवळ तुरुंगातून सुटला. बाकी गुन्ह्यातदेखील घायवळला जामीन मिळाला आणि 2023 मध्ये तो अखेर तुरुंगातून बाहेर आला