Nighttime Heist : Rs. 15 Lakh Stolen from Jewelry Shop in Nallasopara
ज्वेलर्स दुकानावर दरोडा घालणाऱ्या तीन आरोपींना जेरबंद
•विरार पोलिसांच्या गुन्हे कक्ष- 3 यांची कामगिरी ; तीन आरोपींना अटक, चोरीसाठी वापरलेली बोलेरो कार जप्त, एक आरोपी सराईत गुन्हेगार
नालासोपारा :- नाकोडा ज्वेलर्स या दुकानावर 15 मे च्या मध्ये रात्री, ज्वेलर्सचे शटर तोडून दुकानांमधील सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम असा एकूण पंधरा लाख सत्तावीस हजार सातशे रुपये चा मुद्देमाल चोरीला गेल्याचे तक्रार दुकानाचे मालक यांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली होती. पोलिसांनी फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांकडून आरोपीचा शोध
मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून घरफोडीच्या गुन्ह्यात वाढ होत आहे या अनुषंगाने वरिष्ठांनी गांभीर्य लक्षात घेऊन सदर गुन्हेगारीला पायबंदी घालण्याकरता कठोर पाऊल उचलले आहे. पोलीस उपायुक्त गुन्हे आणि सहाय्यक पोलीस उपायुक्त गुन्हे यांनी दिलेल्या आदेशाने गुन्ह्याचा समांतर तपास दरम्यान घटनास्थळीवरील सीसीटीव्ही फुटेज च्या मदतीने आणि पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तीन आरोपींना मालाड कर्नाटक आणि भिवंडी या तीन ठिकाणातून 29 मे रोजी अटक केली आहे. तसेच ज्वेलर्स वर दरोडा टाकताना या चोरट्यांनी बोलेरो कार आणि त्यादरम्यान वापरलेले साहित्यासह असा पाच लाख 42 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त केला आहे.
आरोपींची नावे
1.मोहम्मद शाहिद अल्लाउद्दीन खान (44 वर्ष), मालाड मुंबई.
2.शंकर मंजू गौडा (49 वर्ष) कर्नाटक राज्य.
3.शमशुद दोहा रईस कुरेशी (33 वर्ष), भिवंडी.
या तीन आरोपींना अटक केली असून शंकर गौडा याच्यावर दरोडा आणि घरफोडी सारखे गंभीर गुन्ह्याचे वेगवेगळे पोलीस ठाण्यात नोंद आहे. तसेच आरोपींनी दरोडा टाकताना वापरलेली गाडी बोलेरो कार याचा नंबर प्लेट बनावट असून पोलिसांना अनेक नंबर प्लेट भेटल्या आहे.
पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) मि.भा.वि.व पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, पोलीस हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, सचिन घेरे, मुकेश तटकरे, सागर बारवकर, अश्विन पाटील, राकेश पवार, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, सुमित जाधव, मनोज तारडे, तुषार दळवी, आतिश पवार, प्रविण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनवणे सर्व नेमणुक गुन्हे शाखा कक्ष 3 तसेच सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण सायबर सेल यांनी उकृष्टरित्या पार पाडली आहे.