NIA Raids : एनआयएची दहशतवादी फंडिंगवर मोठी कारवाई, जम्मू-काश्मीर-महाराष्ट्रासह 5 राज्यांमध्ये छापे, जैश-ए-मोहम्मदशी संबंध
•एनआयएने देशविरोधी कारवायांसाठी निधी मिळण्याबाबत जम्मू-काश्मीर आणि महाराष्ट्रात छापे टाकले आहेत. एनआयएने छापेमारीनंतर 4 संशयितांना ताब्यात घेतले.
ANI :- एनआयए (नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी) ने दहशतवादी फंडिंग संदर्भात मोठी कारवाई केली आहे. एनआयएने जम्मू काश्मीर आणि महाराष्ट्र या पाच राज्यांमध्ये छापे टाकले. दहशतवादी फंडिंग विरोधात कारवाई करत NIA ने जवळपास 22 ठिकाणी छापे टाकले.
एनआयएने छापेमारीनंतर 4 संशयितांना ताब्यात घेतले. महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातून 2 जणांना ताब्यात घेण्यात आले, तर छत्रपती संभाजी नगर येथून 1 आणि मालेगाव येथून 1 व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. या चार संशयितांची चौकशी सुरू असून मिळालेल्या माहितीनुसार या चौघांचेही जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंध आहेत.
एनआयएने जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथेही छापे टाकले आहेत. दहशतवादी घटनांचा तपास करण्यासाठी हा छापा टाकण्यात आला आहे. याशिवाय जम्मू-काश्मीर आणि महाराष्ट्रात तसेच राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश आणि आसाममध्ये एनआयएचे छापे सुरू आहेत. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या टेरर फंडिंगबाबत हा छापा टाकण्यात आला आहे.