Pahaltan Doctor Suicide News : आत्महत्या की हत्या? ‘निरीक्षक’ शब्दाच्या वेलांटीवरून प्रश्नचिन्ह; रुपाली चाकणकरांवरही गंभीर आरोप
पुणे :- फलटण येथील डॉक्टर महिलेच्या मृत्यू Phaltan Suicide News प्रकरणामध्ये आता एक अत्यंत महत्त्वाचे आणि वेगळे वळण आले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे Sushma Andhare यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत, मृत महिला डॉक्टरने लिहिलेल्या कथित सुसाईड नोटमधील अक्षर तिचे नसल्याचा गंभीर दावा केला आहे.
अंधारे यांनी या दाव्यासाठी लेखनातील पुराव्यांचा आधार घेतला. त्यांनी सांगितले की, मृत महिला डॉक्टरने यापूर्वी लिहिलेल्या एका चारपानी पत्रातील आणि सुसाईड नोटमधील एकाच शब्दाच्या लेखनात मोठी तफावत आहे. त्यामुळे हा प्रकार आत्महत्या आहे की हत्या, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
‘वेलांटी’वरून लेखनावर प्रश्न
सुषमा अंधारे यांनी डॉ. संपदा हांडे यांनी लिहिलेल्या एका चारपानी पत्रातील आणि हातावर लिहिलेल्या मेसेजमधील ‘निरीक्षक’ या शब्दाचा उल्लेख केला. “महिला डॉक्टरने चारपानी पत्रात ‘निरीक्षक’ हा शब्द जवळपास नऊ वेळा लिहिलेला आहे. या शब्दातील ‘र’ची वेलांटी दीर्घ (दुसरी) आहे.”सुसाईड नोटमधील लेखन: “अगदी त्याच वेळेला तिच्या हातावर जो ‘निरीक्षक’ शब्द लिहिला आहे, त्याची वेलांटी पहिली आहे.”
नऊ वेळा एकच शब्द एकाच पद्धतीने लिहिणारी महिला डॉक्टर सुसाईड नोटमध्ये तो शब्द चुकीचा कसा लिहू शकते? असा सवाल उपस्थित करत अंधारे यांनी हे धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. हे काम पोलिसांचे असले तरी मी त्यांना सोपे करून देत असल्याचे त्या म्हणाल्या.
‘मृत्यूनंतर व्हॉट्सॲप स्टेटस लाईक कसे झाले?’
अंधारे यांनी या प्रकरणाला अधिक गंभीर वळण दिले. मृत्यूनंतरच्या काही वेळेबद्दल बोलताना, त्या म्हणाल्या की, डॉक्टर तरुणीच्या बहिणीने तिला कॉल केला होता. तसेच, त्या डॉक्टर महिलेचा भावाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी “मृत्यूनंतर व्हॉट्सॲप स्टेटस लाईक कसे केले जाऊ शकते?” असा गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे.
महिला आयोग आणि सीडीआरवर टीका
यावेळी त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरही जोरदार टीका केली.
“काल निंबाळकर यांच्या प्रवक्त्या म्हणून महिला आयोगाच्या व्यक्ती तिकडे बसल्या होत्या. त्यांनी (चाकणकर) रणजितसिंह निंबाळकर यांच्याविषयी काहीच सांगितले नाही, पण मुलीच्या सीडीआरबद्दल बोलल्या.”
अंधारे यांनी पोलिसांना थेट प्रश्न विचारला, “पोलिसांना त्या मुलीचा मोबाईल आणि तिचं सीडीआर लीक करण्याचा अधिकार कोणी दिला?”
“हे सीडीआर महिला आयोगाला दिले असं गृहित धरले तरी, त्यांनी कोणत्या अधिकाराच्या खाली त्याबद्दल भाष्य केले? त्यांना तो अधिकार नसेल तर राष्ट्रीय महिला आयोगाने अशा व्यक्तीला पदावर ठेवायचा की नाही हा विचार करावा,” अशी मागणी करत त्यांनी राष्ट्रीय महिला आयोगाने तातडीने चाकणकरांकडून स्पष्टीकरण मागावे, अशी मागणी केली आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…