पिंपरी चिंचवड

New Poona Club | न्यू पुना क्लब येथून ३ चंदनाची झाडे चोरी

  • वारंवार चंदनाची झाडे चोरीला New Poona Club
  • सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांना तपास करणे अवघड

पुणे, दि. १४ सप्टेंबर, महाराष्ट्र मिरर
मुबारक जिनेरी

पुण्याच्या लष्कर भागात अतिसुरक्षित स्थानावरून चंदनाची झाडे चोरीला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजेंद्रसिंह रोड, कॅम्प येथील न्यू पूना क्लब येथून वारंवार चंदनाची झाडे चोरीला जात आहेत. पुणे शहरात चंदनाची झाडे चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे. New Poona Club

याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बंडगार्डन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्रसिंह रोड स्थित न्यू पूना क्लब येथून ३० ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान ३ चंदनाची झाडे चोरण्यात आली आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता सदरील क्लबमध्ये सीसीटीव्ही उपलब्ध नव्हते ज्यामुळे आरोपींचा तपास करणे अवघड होत आहे. New Poona Club

न्यू पूना क्लब येथे लग्न कार्य, कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर साजरे करण्यात येतात, असे असतानाही येथे सीसीटीव्ही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने येथील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाले आहेत. Pune news

Maharashtra Mirror

Recent Posts

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

14 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

14 hours ago

Supriya Sule : राज्यसभेचा ‘पेच’ सुटणार? शरद पवारांच्या उमेदवारीसाठी सुप्रिया सुळेंचे ‘दिल्ली मिशन’; तर ठाकरेंच्या शिवसेनेचाही जागेवर दावा

•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…

20 hours ago