मुंबई

Anjali Damania On Ajit Pawar : राजकीय वर्तुळात नवा वाद ; सूरज चव्हाण यांना दिलेल्या नव्या जबाबदारीवरून अंजली दमानियांचा अजित पवारांवर निशाणा

•”फडणवीस म्हणायचे, चक्की पिसिंग आणि पिसिंग…”: विरोधकांचा जुना प्रचार पुन्हा चर्चेत

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांना नुकत्याच मिळालेल्या सरचिटणीस पदावरून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात नवी चर्चा सुरू झाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या नियुक्तीवरून थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. अवघ्या 23 दिवसांपूर्वी ज्या व्यक्तीवर चुकीच्या वर्तणुकीबद्दल कारवाई करण्यात आली होती, त्याच व्यक्तीला आता मोठे पद दिल्याने अजित पवारांच्या शब्दांवर लोक विश्वास कसा ठेवणार, असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केला आहे.

अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल करताना, “राष्ट्रवादीत सगळ्यांवरच गुन्हे आहेत, सगळ्यांवरच गुंडागर्दीचे आरोप आहेत,” असे म्हटले आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांवर केलेल्या जुन्या टीकेची आठवण करून दिली. “फडणवीस अजित पवारांबद्दल काय म्हणायचे, चक्की पिसिंग अँड पिसिंग,” असे सांगून त्यांनी भाजप-राष्ट्रवादीच्या युतीवरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

याचवेळी दमानिया यांनी इतर नेत्यांवरही टीका केली. छगन भुजबळ यांच्या ‘महाराष्ट्र सदन’ घोटाळ्याच्या सुनावणीसंदर्भात बोलताना, त्यांनी या प्रकरणात दाखल केलेल्या याचिकेची आज सुनावणी असल्याचे सांगितले. त्याचबरोबर, धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधताना, त्यांनी ‘खोटारडेपणाचा नॅशनल अवॉर्ड’ देण्याची मागणी केली. “आधी मुंबईत घर नाही म्हणून बंगल्यात राहायचं म्हणाले आणि आता त्यांचे मुंबईत घर आहे,” अशा शब्दांत त्यांनी मुंडे यांच्यावर टीका केली.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

19 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago