मुंबई

कल्याणमध्ये भूमाफियाची नवी क्लृप्ती : बनावट सुधारित बांधकाम परवानगीने पालिका-शासनाला फसवले

  • भूमाफिया सलमान डोलारे याच्यावर वर्षभरात फसवणुकीचे अनेक गुन्हे; यापूर्वीही बेकायदा बांधकामाचे आरोप

कल्याण :- कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील ‘क’ प्रभाग कार्यालयाच्या अंतर्गत बैलबाजार परिसरात एका सहा मजली गृहसंकुलाची बनावट सुधारित बांधकाम परवानगी तयार करून भूमाफियाने पालिका प्रशासन आणि शासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पालिकेच्या नगररचना विभागातील अधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरून बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

भूमाफियावर गुन्हा दाखल

सलमान अनिस डोलारे (वय 42, रा. मरियम टॉवर, दूधनाका, कल्याण) असे गुन्हा दाखल झालेल्या भूमाफियाचे नाव आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेचे नगररचनाकार सुरेंद्र टेंगळे यांच्या तक्रारीनुसार, डोलारे यांच्याविरुद्ध फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार करणे अशा गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमका प्रकार काय?

पालिकेच्या नगररचनाकाराने दिलेल्या तक्रारीनुसार, सन 2023 मध्ये सलमान डोलारे यांनी बैलबाजार येथील एका नवीन इमारतीच्या बांधकाम संदर्भात सुधारित बांधकाम परवानगीची कागदपत्रे ‘क’ प्रभाग कार्यालयात दाखल केली होती. या कागदपत्रांवर पालिकेच्या नगररचना विभागाने दिलेला मंजुरी क्रमांक आणि तारीख नमूद होती. ही इमारत तळमजला (Stilt) आणि सहा माळे अशी प्रस्तावित होती.

परंतु, ‘क’ प्रभाग कार्यालयातील तत्कालीन अधिकाऱ्यांनी ही कागदपत्रे पडताळणीसाठी नगररचना विभागाकडे पाठवली असता, धक्कादायक बाब समोर आली. या कागदपत्रांवर नमूद असलेला मंजुरी क्रमांक नगररचना विभागाच्या अभिलेखात (Records) उपलब्ध नव्हता. सलमान डोलारे यांना अशा प्रकारची कोणतीही सुधारित बांधकाम परवानगी पालिकेने दिलीच नसल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.

डोलारे यापूर्वीही वादात

भूमाफिया सलमान डोलारे याच्यावर गेल्या वर्षभरात अनेक गुन्हे दाखल आहेत. घर खरेदीत फसवणूक केल्याबद्दल पालिका सेवेतील एका कर्मचाऱ्यासह इतरांनी त्याच्यावर बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तसेच, पालिकेच्या बागेसाठी आरक्षित भूखंडावर बेकायदा इमारत उभारल्याप्रकरणीही त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणांचा तपास सध्या ठाणे गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

43 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago