महाराष्ट्र मिरर
विवेक राजेंद्र जगताप
नेरूळ | “नशा सोडा… भविष्य घडवा!” या दमदार घोषणांनी आज नेरूळ शहर दणाणून गेलं. एसआयईएस कॉलेज आणि नेरूळ पोलीस ठाणे Nerul Police Staion यांच्या संयुक्त विद्यमाने नशा मुक्ती अभियान अंतर्गत काढण्यात आलेल्या प्रचंड जनजागृती रॅलीने परिसराला जागं केलं. Nerul Latest News
रॅलीची सुरुवात कॉलेजच्या मुख्य गेटपासून होताच, शेकडो विद्यार्थी “नशा ही जाळ आहे, दूर राहा”, “व्यसनमुक्त भारत घडवा” अशी जोरदार घोषणा देत सेक्टर 3, 11, 15 मधील प्रमुख रस्त्यांवरून पुढे सरकले. प्रत्येक वळणावर नागरिक थबकून या तरुणाईचा उत्साह पाहत होते. Navi Mumbai Police Latest News
स्टेशनवर उत्कर्षबिंदू
नेरूळ रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यावर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या थरारक पथनाट्याने प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणले. नशेचे घातक परिणाम आणि व्यसनमुक्त जीवनाची ताकद उलगडून दाखवणाऱ्या या नाट्यप्रयोगाला उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून दाद दिली.
जबरदस्त सहभाग
या रॅलीत १०० ते १५० विद्यार्थी, नेरूळ पोलीस ठाण्याचे ३ पोलीस अधिकारी आणि १५ पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मनंद नाईकवाडी यांनी विद्यार्थ्यांच्या जोशाचे कौतुक करत “तरुणाईची ताकदच नशा निर्मूलनाचे शस्त्र आहे” असा संदेश दिला.
नेरूळकरांना दिला इशारा
या रॅलीने शहरातील व्यसनाधीनांना कठोर इशारा दिला – “आता थांबा, नाहीतर समाज जागा आहे!”
नेरूळच्या रस्त्यांवर घुमणाऱ्या या आवाजाने संपूर्ण परिसराला नशामुक्त भविष्यासाठी नवी प्रेरणा दिली.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…