Nepal Bus Accident News: नेपाळ देशात झालेल्या बस अपघातात महाराष्ट्रातील 14 पर्यटकांचा मृत्यू, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले निर्देश
Nepal Bus Accident News: मंत्री गिरीश महाजन आणि अनिल पाटील यांच्याकडून परिस्थितीचा आढावा, तर सर्व पर्यटक हे जळगाव जिल्ह्यातील असल्याचे सांगितले
मुंबई :- गोरखपूर केसरवाणी परिवहन बस सकाळी पोखरा येथून काठमांडूसाठी निघाली होती, मात्र मोगलीच्या सुमारास बस डोंगरावरून घसरून नदीत पडली. महाराष्ट्रातील पर्यटकांनी गोरखपूरच्या केसरवाणी परिवहनच्या दोन बसेस आणि प्रयागराजच्या एका प्रवाशाने बुक केल्या होत्या. सर्व पर्यटक प्रयागराजहून पांडुरंग यात्रेसाठी निघाले होते. केसरवाणी परिवहनच्या दोन बस आणि एक प्रवासी असे एकूण 110 प्रवासी होते.पांडुरंग यात्रा चित्रकूट धाम, अयोध्या धाम मार्गे गोरखपूरला पोहोचली. गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर सर्व पर्यटक नेपाळमधील बुद्धाचे जन्मस्थान असलेल्या लुंबिनी येथे गेले आणि तेथे दर्शन घेतल्यानंतर पोखराकडे रवाना झाले. या प्रवासात बस नदीत पडली असून जवळपास 14 पर्यटक यामध्ये मृत्युमुखी पडले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील 14 व्यक्तींना फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली असून उर्वरित जखमी व्यक्तींवर तात्काळ उपचार करण्याचे निर्देश अपत्कालीन विभागाला दिले आहे. तसेच जिल्हाधिकारी आणि मंत्री गिरीश महाजन, अनिल पाटील हे संपूर्ण परिस्थितीचे आढावा घेत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले,नेपाळमध्ये एक बस दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत महाराष्ट्रातील काही भाविकांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जखमींना लवकर आराम पडावा, अशी प्रार्थना करतो.
प्रारंभिक माहितीनुसार, हे भाविक जळगाव जिल्ह्यातील असल्याचे कळते आहे. राज्य सरकारने तत्काळ नेपाळ दुतावासाशी संपर्क साधला असून, जळगावचे जिल्हाधिकारी हे नेपाळ सीमेवर असलेल्या उत्तरप्रदेशातील महाराजगंज जिल्हाधिकार्यांशी सातत्याने संपर्कात आहेत. एक प्रांत आणि पोलिस उपअधीक्षक ते सोबत देत असून नेपाळ सीमेवर ते जाणार आहेत. जखमींना तातडीने वैद्यकीय सुविधा देणे, यासाठी आपले अधिकारी सातत्याने संपर्कात आहेत. नेपाळ सरकारशी समन्वय साधून मृतांचे पार्थिव महाराष्ट्रात आणण्यासाठी आम्ही उत्तरप्रदेश सरकारच्या संपर्कात आहोत. महाराष्ट्रातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सुद्धा समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, स्वत: मंत्री गिरीश महाजन आणि अनिल पाटील हे सुद्धा सातत्याने संपर्कात आहेत.