
Thane Congress Member Meeting : प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत आज होणार बैठक
ठाणे :- आगामी ठाणे महानगरपालिका Thane BMC निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. शिंदे यांची शिवसेना आणि भाजपनंतर आता काँग्रेसनेही तयारी सुरू केली आहे. याच अनुषंगाने ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज, गुरुवारी (18 सप्टेंबर) संघटनात्मक आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. Thane Latest Political News
ही बैठक ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे सकाळी 11 वाजता होणार आहे. या बैठकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार विशेषत्वाने उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात पक्षाची पुढील दिशा आणि रणनीती ठरवण्यावर भर दिला जाईल.
या बैठकीपूर्वी दोन्ही नेते पत्रकारांशी संवाद साधणार असल्याची माहिती ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी दिली. या बैठकीच्या माध्यमातून पक्षाला पुन्हा एकदा उभारी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.


