Neelam Gorhe : विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा
•एकनाथ शिंदे यांच्या सरकारने विधान परिषदेच्या उपसभापती Neelam Gorhe यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला आहे.शिवसेनेच्या पहिल्या महिला मंत्री असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे
मुंबई :- विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना आता कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री सचिवालायकडून राजशिष्टाचार विभागाने याबाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं आहे. नीलम गोऱ्हे यांना 2 ऑगस्ट 2024 च्या निर्णयानुसार कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. दुसरीकडे शिंदे सरकारमध्ये नीलम गोऱ्हे या पहिल्या शिवसेनेच्या महिला कॅबिनेट मंत्री झाल्या असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
राजकीय प्रवास
कट्टर शिवसैनिक म्हणून पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आदी भागात कार्यरत. 2015 पासून विधानपरिषदेतील शिवसेनेच्या मुख्य प्रतोद म्हणून कार्यरत.
शिवसेना उपनेत्या 2005
शिवसेना प्रवक्त्या — 2007
शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख- 2010
सन 2007 ते आजतागायत (2020) पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून सामाजिक न्याय, राजकीय भूमिका विषयांवर कार्य व मराठी, हिंदी, इंग्रजी वाहिन्यांवर सामाजिक विषयांवर 600 चर्चासत्रात सहभाग.
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सन्माननीय सदस्य म्हणून तीन वेळा कार्यकाळ भूषविण्यात आला.
(2002 – 2008, 2008 ते 2014, 2014 ते आजपर्यंत)
शिवसेना फुटी नंतर काही कालावधीतच नीलम गो-हे यांनी एकनाथ शिंदे यांच्या धनुष्यबाण हाती घेतले. तसेच मागील एक दशकापासून नीलम गोऱ्हे हे विधान परिषदेच्या उपसभापती पदावर विराजमान आहे. सुषमा अंधारे यांना कंटाळून पक्ष सोडल्याचे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले होते.