ठाणे

“वरून” हा शब्द ठाण्यात सुरू, जितेंद्र आवड यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निशाणा साधत ट्विट

NCP Sharad Pawar Party Member Jitendra Awhad On CM Eknath Shinde : मुंब्रा आणि दिवादरम्यान खाडी नष्ट केली जात आहे ; राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र वडे यांचा गंभीर आरोप.

ठाणे :- राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड Jitendra Awhad यांनी केले आहे. आव्हाड Jitendra Awhad यांनी मुंब्रा Mumbra आणि दिवादरम्यान Diva Khadi खाडी नष्ट केली जात असल्याचे म्हटले आहे. तसेच या ठिकाणी रोज अनेक डंपर्समधून मातीचा भराव या खाडीत टाकण्यात येत असून हा सर्व प्रकार पोलिस संरक्षणात सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यावरूनच त्यांनी ट्विट केले आहे. Jitendra Awhad Latest Tweet

जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट काय?

“जेव्हा मुंब्रा नवीन होते; तेव्हा एका बोहरी मुस्लीम माणसाने जमीन घेतली होती. त्या जमिनीवर जाण्यासाठी त्याने स्वतः एक पुल बनवला होता. तो पूल आजही अस्तित्वात असून “चुहा ब्रिज” या नावाने तो ओळखला जातो. त्या माणसाचे नाव चुहाशेठ असल्यानेच या पुलाचे नाव चुहापूल असे पडले. या पुलावरून पुढे गेल्यावर सुरूवातीला साबे आणि नंतर दिवा गाव लागते. या भागातील जमिनी तेथील गरीब शेतकरी कसत होते. या जमिनी त्या शेतकऱ्यांच्या ताब्यात होत्या. काही दिवसांपूर्वी रात्रीच्या अंधारात पोलीस आले अन् संपूर्ण जमिनीवर कब्जा घेतला. त्या दिवसापासून हजारो डंपर्समधून माती टाकली जात असून सपाटीकरणासाठी सहा पोकलेन आणि अनेक जेसीबी काम करीत आहेत. या जेसीबी, पोकलेन आणि डंपरचे संरक्षण करण्यासाठी रात्री 50 पोलीस तैनात असतात”, असे आव्हाड म्हणाले.वरून” हा शब्द ठाण्यात सुरू झालाय पुढे त्यांनी म्हंटले आहे की, “या ठिकाणी करण्यात येत असलेली भरणी अनधिकृत आहे. मा. उच्च न्यायालयाने हा परिसर सीआरझेडमध्ये समाविष्ट असल्याचे घोषित केले आहे. शिवाय, प्लानमध्येही हा परिसर सीआरझेडचाच असल्याचे दिसत आहे. ऐन निवडणुकीत हे काम कोण करतंय, याबाबत प्रशासनातील कोणतेही अधिकारी बोलायला तयार नाहीत. पोलिसांना विचारणा केल्यास पोलीस, ‘वरून आलंय’, असे सांगतात. “वरून” हा शब्द ठाण्यात सुरू झालाय; तो वरून हा शब्द कुठून येतो, हेच कळत नाही. हे सर्व संशयास्पद तर आहेच; पण, त्याहीपेक्षा ते अतिशय धोकादायक आहे. कारण, यामुळे सबंध मुंब्रा, दिवा पाण्यात जाणार आहे. 12 ते 15 फूट पाणी भरेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. आधीच मुंब्यातून जी खाडी जाते; तिचा बुजवून बुजवून तिचा नाला झालाय”.Jitendra Awhad Latest Tweet

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात हे घडतंय पुढे आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याप्रकरणी दखल घेण्याची विनंती केली आहे. “जर हे गांभीर्यपूर्वक घेतले नाही तर या शहराच्या -हासाला आपण जबाबदार आहोत, याचे उत्तर आज ना उद्या इथल्या प्रशासनाला द्यावेच लागेल. देव या शासन-प्रशासनाचे भले करो. पण, एवढंच लक्षात ठेवा, हे मुख्यमंत्री यांच्या ठाणे महानगर पालिकेत घडतंय. मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे”, असे आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे. Jitendra Awhad Latest Tweet

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0