NCP News : राष्ट्रवादीचे दोन किल्ले, एकाच दिवशी शक्तिप्रदर्शन! पुण्यात 10 जूनला ‘पवार वि. पवार’

NCP Latest News : अजित पवार गटाचा बालेवाडीत मेगा जलसा; 15 हजार कार्यकर्त्यांची हजेरी,शरद पवारांचे बालगंधर्ववर प्रत्युत्तर; “खरी राष्ट्रवादी” कोण, यावरच लढाई
पुणे :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला 26 वर्षे पूर्ण होत असताना, यंदा पुण्यात 10 जून हा दिवस ‘शक्ती, प्रतिष्ठा आणि नियंत्रण’ यांचा निर्णायक सामना ठरणार आहे. पक्ष फाटल्यानंतर पहिल्यांदाच दोन्ही गट आपापल्या पद्धतीने वर्धापन दिन साजरा करत असून, “एक पक्ष – दोन मैदानं – दोन पवार!” हे दृश्य पुणेकर पाहणार आहेत. NCP Latest News
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा Ajit Pawar गट बालेवाडी स्टेडियममध्ये भव्य जलसा भरवणार असून, राज्यभरातून तब्बल 15 हजार कार्यकर्त्यांची गर्दी अपेक्षित आहे. दुसरीकडे, शरद पवार Sharad Pawar यांच्या गटाने बालगंधर्व रंगमंदिरात ठामपणे आपली हजेरी लावण्याची तयारी केली आहे.
दोन्ही गटांनी वर्धापन दिनाच्या निमित्ताने एकमेकांवर वर्चस्व गाजवण्याची रणनीती आखली आहे. या दोन मंचांवरून दोन पवार आपापल्या समर्थकांसमोर भाषण करताना, अप्रत्यक्षपणे एकमेकांवर निशाणा साधण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या दिवशी राष्ट्रवादी कोणाची, हे ठरवण्यासाठी मैदानात केवळ नेते नव्हे, तर भावना, इतिहास आणि भविष्यातील दावे समोर येणार आहेत. त्यामुळे 10 जून हा दिवस फक्त वर्धापन दिनापुरता न राहता, पुढील निवडणूक रेषेवर परिणाम करणारा ठरू शकतो.



