NCP News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह यांचे सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
NCP News नागालँड मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांच्या अपात्रता प्रकरणावर ही सुनावणी
मुंबई :- सर्वोच्च न्यायालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह आणि नाव याच्यावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. तसेच नागालँड मधील राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्र प्रकरणीही सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती भुयान यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटी नंतर शरद पवार यांनी न्यायालयात धाव घेतली होती. पक्ष आणि चिन्हाबाबत वाद सुरू आहे. पक्ष फुटी नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना देण्यात आले. संख्याबळाच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला देण्याचे निवडणूक आयोगाने घोषित केले. आयोगाच्या या निर्णयावर शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली सुप्रीम कोर्टाने संख्याबळाच्या जोरावर निवडणूक आयोगाच्या संख्याबळानुसारच राष्ट्रवादी ही अजित पवार यांची असल्याचे घोषित केले त्यानंतर ही सुप्रीम कोर्टात विविध मुद्द्यांवर घेऊन शरद पवार गट न्यायालयीन लढा देत आहे.
लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने शरद पवार गटांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असे पक्षाचे नाव दिले असून त्यांचे चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस असे देण्यात आले होते. शरद पवार यांच्या तुतारीच्याच चिन्हाबरोबरच इतरही चिन्हांमध्ये तुतारी देण्यात आली होती त्याला ट्रम्पड यालाही तुतारीच चिन्हाचे नाव दिले होते त्यामुळे लोकांमध्ये संग्राम झाला. त्याच्या विरोधात पवार गट सुप्रीम कोर्टात गेले आहे. सर्व प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात चर्चा होण्याची शक्यता दर्शवली आहे.सर्वोच्च न्यायालयाचे वकील ॲड. सिद्धार्थ शिंदे यांनी शरद पवारांना मिळालेले नाव आणि चिन्हही कायम राहू शकते, असे मत व्यक्त केले होते. शरद पवार गट न्यायालयात जाईल आणि आपल्याला मिळालेलं नाव आणि चिन्ह कायम राहावं अशी कदाचित मागणी करतील, असेही ते म्हणाले होते. त्यामुळे सध्या राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वाद हा सर्वोच्च न्यायालयात आहे.