क्राईम न्यूजमुंबई
Trending

Naygaon Police News : नायगाव पोलीस ठाणे यांची कामगिरी बेपत्ता इसमाचा अखेर लागला शोध; दोन अल्पवयीन आरोपींना घेतले ताब्यात

Naygaon Police News : एक महिन्यापासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा सुगावा लावण्यात नायगाव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश आले आहे.

भाईंदर :- एक महिन्यापासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा सुगावा लावण्यात नायगाव पोलिसांना यश आले आहे. Naygaon Police Station परंतु, पोलिसांना तो व्यक्ती जिवंत नव्हे तर मृत मिळाला आहे. दरम्यान, पोलिसांनी या खून प्रकरणात दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतली आहे. Naygaon Police Latest News

नायगाव पोलीस ठाण्याच्या बोरीवली येथे किशोर ब्रिजमोहन मिश्रा (वय 75) 15 फेब्रुवारी 2024 रोजी मिसिंग झाल्याची तक्रार नायगाव पोलीस ठाण्यात त्यांचा मुलगा श्यामलाल किशोर मिश्रा यांनी दिली होती. किशोर मिश्रा हे फेरीचा व्यवसाय करत होते. किशोर मिश्रा यांचा मोबाईल ही स्विच ऑफ असल्यामुळे त्यांचा शोध घेणे पोलिसांसाठी एक आव्हानात्मक होते.

नायगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदम यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या दोन वेगवेगळे पथक तयार करून मिसिंग प्रकरणाचे तपासण्या दरम्यान मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे मिसिंग व्यक्ती हा एका मुलीसोबत भाईंदर रेल्वे स्थानकातून बाहेर पडताना दिसत आहे. पोलिसांनी किशोर शर्मा आणि त्याच्यासोबत असलेले एका मुलीचा पोलिसांकडून तपास घेत असताना पोलिसांना तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार संशयित अल्पवयीन आरोपी आणि तिचा मित्र यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलिसांनी दोघांचीही कसून चौकशी केली असता आरोपींनी माहिती दिली आहे की, किशोर विसरा हा पोलीस कामाच्या ठिकाणी कायम शिवीगाळ करत असल्याने त्याच गोष्टीचा राग मनात धरून तिच्या मित्राने आणि तिने तुषार मेश्रा यांना बादलशहा पीर दर्गाच्या बाजूला असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या जवळ डोक्यात दगड घालून जीवे ठार मारले. तसेच किशोर मिश्रा यांचा मृतदेह झाडाझुडपात फेकून दिला. अशी माहिती पोलिसांना आरोपींनी दिली आहे. याप्रकरणी उत्तन सागरी पोलीस ठाणे Utaan Sagari Police Station येथे अल्पवयीन आरोपींच्या विरोधात बी एन एस कायदा कलम 103(1),238,3(5) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपींना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलीस पथक
मधुकर पांण्डेय, पोलीस आयुक्त, दत्तात्रय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त, श्रीमती पौणिमा चौगुले पोलीस उप आयुक्त, परीमंडळ-2 वसई, नवनाथ घोगरे, सहाय्यक पोलीस आयुक्त वसई विभाग, नायगाव पोलीस ठाणे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद पवार यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोशन देवरे, गणेश केकान, पोलीस हवालदार देविदास पाटील, शेखर पवार, पोलीस अंमलदार सचिन ओलेकर, सचिन मोहीते, सचिन खंताळ, जयवंत खंडवी, अमर पवार, चेतन ठाकरे, अशोक पाटील, पाडुरंग महाले, पोलीस शिपाई अमोल बरडे नेमणुक पो.उप आयुक्त सोो परिमंडळ-2, वसई यांनी यशस्वीरित्या कामगीरी पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0
06:42