क्राईम न्यूज

Naygaon Police News : नायगाव पोलिसांची मोठी ‘ड्रग’ कारवाई! सोलापूर बाबा दर्गाजवळ पती-पत्नीसह 36 हजारांचा गांजा जप्त

Naygaon Police Busted Drug Racket : 1.668 किलो अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोघांना अटक; पालघर जिल्ह्यात खळबळ

वसई :- अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात नायगाव पोलीस ठाणे गुन्हे Naygaon Police Crime Branch प्रकटीकरण शाखेने एक मोठी आणि लक्षणीय कारवाई केली आहे. गुप्त बातमीच्या आधारावर पोलिसांनी 1 किलो 668 ग्रॅम वजनाचा, सुमारे 36 हजार 600 किंमतीचा गांजा अंमली पदार्थ विक्रीसाठी बाळगणाऱ्या एका पती-पत्नीला जेरबंद केले आहे. Vasai Police Latest News

नायगाव पोलीस ठाणे हद्दीतील सोलापूर बाबा दर्गाजवळ, रामवाडी, गोरातपाडा, चिंचोटी (ता. वसई) येथे (6 नोव्हेंबर) ही कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश केकान यांना गांजाची विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक अभिजीत मडके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचला. Vasai Police Latest Drug News

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये सुषमा पप्पू विश्वकर्मा (वय 30) आणि पप्पू राजनाथ विश्वकर्मा (वय 35, मूळ रा. जौनपूर, उत्तर प्रदेश) या दोघांचा समावेश आहे. त्यांच्या कब्जात बेकायदेशीररित्या गांजा आणि मोबाईल असा एकूण 51 हजार 600 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या दोघांविरुद्ध नायगाव पोलीस ठाणे येथे एन.डी.पी.एस. कायदा 1985 चे कलम 8 (सी), 20 (ब), 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश केकान आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे. या कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

40 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago