Naygaon Police Arrested Robbers : महालक्ष्मी ज्वेलर्सवर ‘डाका’ टाकण्याचा प्रयत्न फसला; सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांमुळे आरोपी जेरबंद
वसई :- नायगाव पोलीस ठाण्याच्या Naygaon Police Station हद्दीत एका ज्वेलर्सच्या दुकानाची भिंत फोडून आणि अत्याधुनिक गॅस कटरचा वापर करून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन आरोपींना नायगाव पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेने Vasai Virar Crime Branch तांत्रिक कौशल्य वापरून ही मोठी कारवाई केली आहे. Vasai Virar Latest Crime News
गुन्हेगारांनी आखला होता मोठा कट
14 ते 15 नोव्हेंबर 2025 च्या मध्यरात्रीच्या सुमारास, महालक्ष्मी ज्वेलर्स (टिवरी रोड, नायगाव पूर्व) येथे चोरट्यांनी संगनमत करून चोरीचा डाव आखला होता. या चोरट्यांनी थेट दुकानाच्या पाठीमागील भिंतीला घण आणि पहारीच्या साहाय्याने भगदाड पाडले आणि त्यावाटे आतमध्ये प्रवेश केला. सोन्या-चांदीचे दागिने चोरण्यासाठी त्यांनी लॉकर तोडण्याकरिता गॅस कटरचा वापर करण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी उलगडले ‘चोरीचे’ गूढ
गुन्हा दाखल होताच, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी तातडीने गुन्हे प्रकटीकरण शाखेची दोन पथके नेमली. पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच, संशयित आरोपींनी ये-जा करण्यासाठी वापरलेल्या मार्गांचे विश्लेषण केले. या तांत्रिक आणि गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींना त्यांच्या ठिकाणाहून ताब्यात घेतले.
अंधेरी-वसईमधून आरोपींना अटक
पोलिसांनी या गुन्ह्यात सामील असलेल्या विजय बन्सराज यादव (वय 25, अंधेरी, मुंबई), अमोल देवसीवाई गोहील (वय 32, नायगाव पूर्व) आणि सचिन मेघराज सिंग (वय 33, नायगाव पूर्व) या तिन्ही आरोपींना अंधेरी आणि वसई परिसरातून ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी अमोल गोहील याच्यावर यापूर्वीही बोरीवली पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.या आरोपींविरुद्ध नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…