मुंबई

Nawab Malik : नवाब मलिकांना मोठा धक्का! दाऊद इब्राहिम मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोप निश्चित

Nawab Malik Money Laundering Case : गोवावाला कम्पाउंड जमीन बळकावल्याचा आरोप; विशेष न्यायालयाने दैनंदिन सुनावणीचे निर्देश दिल्याने मलिक यांच्या अडचणी वाढल्या

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या मालमत्तांशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग (Money laundering) प्रकरणात विशेष MP-MLA न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. न्यायालयाने मलिक यांच्यासह इतर आरोपींवर औपचारिकरित्या आरोप निश्चित केले असून, या प्रकरणाची दैनंदिन सुनावणी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. Nawab Malik Money Laundering Case

ईडीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर, तिचा साथीदार सलीम पटेल आणि नवाब मलिक यांनी गोवावाला कम्पाउंडमधील मुनीरा प्लंबर यांच्या मालकीची तीन एकर जमीन कट रचून बळकावली असा गंभीर आरोप आहे. या व्यवहारातून मिळालेला निधी ‘proceeds of crime’ म्हणून वापरला गेल्याचे ईडीचे म्हणणे आहे.

सध्या जामिनावर बाहेर असलेल्या मलिक यांच्या वकिलांनी, ईडीकडून कागदपत्रे मिळेपर्यंत आरोप निश्चिती प्रक्रिया पुढे ढकलण्याची विनंती केली होती. मात्र, विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी ही मागणी स्पष्टपणे फेटाळून लावली. त्यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कोणत्याही प्रकरणात चार आठवड्यांच्या आत आरोप निश्चित करणे आवश्यक आहे. न्यायालयाने पुरावे आणि दस्तऐवजांचा अभ्यास करून, मलिक आणि इतर आरोपींविरुद्धच्या आरोपांना प्राथमिकदृष्ट्या आधार आहे, असे नमूद केले.

न्यायालयाने उच्च न्यायालयात दिलेल्या निवेदनावरही नाराजी व्यक्त करत “खंडपीठाच्या वतीने कोणीही आधीच कोणतेही विधान करू शकत नाही,” अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी नोंदवली. आरोप निश्चित झाल्यामुळे नवाब मलिक यांचा न्यायालयीन लढा आता निर्णायक टप्प्यात प्रवेश करीत असून, त्यांची राजकीय आणि वैयक्तिक चिंता वाढवणारा हा निर्णय आहे.

vivek

Recent Posts