मुंबई

Nawab Malik : माजी मंत्री नवाब मलिक यांना मोठा दिलासा, अंतरिम जामीन इतक्या दिवसांसाठी वाढवला

Nawab Malik News : नवाब मलिक यांना ED ने फेब्रुवारी 2022 मध्ये अंडरवर्ल्ड लिंक्ससह कथित कमी किमतीच्या मालमत्तेच्या व्यवहाराच्या संदर्भात मनी लॉन्ड्रिंग केस (PMLA) अंतर्गत अटक केली होती.

मुंबई :- सुप्रीम कोर्टाने माजी मंत्री नवाब मलिक Nawab Malik यांच्या अंतरिम जामिनाची मुदत आणखी दोन आठवड्यांसाठी वाढवली आहे. मनी लाँड्रिंग Money Laundering प्रकरणातील आरोपी महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक यांच्या अंतरिम वैद्यकीय जामिनाची मुदत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दोन आठवड्यांनी वाढवली. अंमलबजावणी संचालनालयाच्या वकिलाची विनंती मान्य करून न्यायमूर्ती बेला एम. त्रिवेदी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या खटल्याची सुनावणी दोन आठवड्यांनी निश्चित केली आणि त्यादरम्यान अंतरिम दिलासा देण्याचे निर्देश दिले.

जानेवारीमध्ये न्यायालयाने नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव दिलेला तात्पुरता जामीन सहा महिन्यांसाठी वाढवण्याचे आदेश दिले होते. ईडीतर्फे उपस्थित असलेले अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (एएसजी) एस.व्ही. राजू म्हणाले की, मलिकच्या अंतरिम जामीनला सर्वोच्च न्यायालयाने मुदतवाढ दिल्यास फेडरल अँटी मनी लाँडरिंग एजन्सीला हरकत नाही.

ईडीने नवाब मलिकला का अटक केली?

ED ने फेब्रुवारी 2022 मध्ये नवाब मलिकला मनी लाँड्रिंग केस (PMLA) अंतर्गत अंडरवर्ल्ड लिंक्ससह कथित कमी किमतीच्या मालमत्तेच्या व्यवहाराच्या संदर्भात अटक केली होती. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिक यांची वैद्यकीय कारणास्तव दोन महिन्यांच्या जामिनावर तात्पुरती सुटका करण्याचे आदेश दिले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0