ठाणे

‘नवसाला पावणारा बाप्पा’ दर्शनासाठी सज्ज; लालबागच्या राजाचे विलोभनीय रूप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

मुंबई: गणपती बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच, मुंबईतील गणेशोत्सवाचा उत्साह आता शिगेला पोहोचला आहे. देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचा Lalbhaug Cha Raja प्रथम दर्शन सोहळा काल (24 ऑगस्ट) पार पडला आणि लाडक्या बाप्पाच्या विलोभनीय रूपाची पहिली झलक पाहण्यासाठी शेकडो भाविकांनी अलोट गर्दी केली होती. Mumbai Ganapati Ustav 2025

गेले वर्षभर ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहिली जात होती, तो क्षण अखेर आला. ‘नवसाला पावणारा बाप्पा’ अशी ओळख असलेला लालबागचा राजा आता आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे. प्रथम दर्शन सोहळ्यासाठीच भाविकांनी ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करत मोठी गर्दी केली होती, ज्यामुळे गणेशोत्सवाचा श्रीगणेशा आजपासूनच झाला आहे असे म्हणता येईल.

लालबागच्या राजाची ख्याती केवळ मुंबईपुरती मर्यादित नसून, देशभरातील भाविक दरवर्षी या बाप्पाच्या दर्शनासाठी येतात. या वर्षीही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असून, 27 ऑगस्टपासून बाप्पा घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये विराजमान होतील.

दरम्यान, लालबागच्या राजाचे पहिले दर्शन झाल्याने आता गणेशोत्सवाच्या तयारीला आणखी वेग आला आहे. मुंबईतील प्रत्येकजण आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी उत्सुक असून, सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

42 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago