ठाणे
Trending

Navratri 2024 : राज्यातील सर्वात मोठा नवरात्री उत्सव डोंबिवलीत आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची संकल्पना

डोंबिवली : सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख निर्माण झालेल्या डोंबिवलीत दर वर्षी साजरा होणारा नमो रमो गरबा आता फार प्रसिद्ध झाला असल्याने जगप्रसिद्ध गरबा कलाकार या उत्सवात येण्यास नेहमीच उत्सुक असतात. Navratri 2024 यंदा गरबा क्वीन या विशेषणाने संबोधली जाणारी गीताबेन रबारी नवरात्रीचे नऊ दिवस आपल्या नमो रमो नवरात्रीचा उत्सव रंगतदार करण्यास येणार आहे सोबत ख्यातनाम गरबा गायक निलेश गढवी यांची साथ त्यांना लाभणार आहे. नमो रमो नवरात्रीची संकल्पना रुजवणारे आणि सर्व संस्थांच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभे राहणारे डोंबिवलीचे आमदार आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यामुळेच हा नवरात्री उत्सव अत्यंत भक्तिभावाने आणि पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. रविंद्र चव्हाण हे नेहमीच सांस्कृतिक, कला, क्रीडा आणि साहित्य या क्षेत्राला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देत असतात. त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी नमो रमो नवरात्री उत्सवाचे  आयोजन मोठ्या दिमाखात करत असतात. यावर्षी देखील अतिशय भक्तिभावाने हिंदू संस्कृतीप्रमाणे श्री अंबे मातेची प्रतिष्ठापना केली गेली. दररोज सकाळ व संध्याकाळ विधिवत पूजा आरती करून महिषासुर मर्दिनीचा गजर करून देवीला नैवेद्य वाढून आवाहन केलं जातं आणि रात्री भव्य मंडपात देवीसमोर गरबा खेळला जातो. केवळ कल्याण डोंबिवलीच नाही तर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल रायगड, पालघर तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून गरबा खेळण्यासाठी पारंपारिक वेशभूषेत गरबा प्रेमी अवघी तरुणाई या नमो रमो नवरात्रीत उत्साहात सहभागी होतात.
नमो रमो नवरात्रीच्या स्थळाचं पावित्र्य तिथे मंडपातच उभारलेल्या अंबे मातेच्या मंदिरात आहे. आणि यंदाचं प्रमुख आकर्षण म्हणजे मातेच्या या मंदिरात दररोज नव्या नव्या रंगांच्या ताज्या नैसर्गिक फुलांची सजावट करण्यात येणार आहे. ख्यातनाम पुष्परचनाकार श्याम भगत यांच्यातर्फे सजावट करण्यात येणार आहे. Dombivli Ravindra Chavan Navratri Ustav


135 फूट बाय 500 फूट एसी डोम नमो रमो नवरात्रीचे आयोजन 3 ते 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत सावळाराम महाराज क्रीडा संकुल, घरडा सर्कल, डोंबिवली पूर्व. येथे करण्यात आले आहे. यावर्षी संपूर्ण वातानुकूलित 70 हजार स्क्वेअर फूट जागेमध्ये सर्वात मोठ्या 135 फूट बाय 500 फूट अशा भव्य एसी डोमची निर्मिती करण्यात आली आहे. Dombivli Ravindra Chavan Navratri Ustav

सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक संजय धबडे ह्यांनी भव्य सेट उभारला आहे. तसेच यावर्षी पूर्ण वातानुकूलित भव्य एसी डोमची निर्मिती केली आहे. या उत्सवामध्ये फक्त सर्व जाती आणि धर्माचे लोक मोठ्या संख्येने उत्साहाने सहभागी होतात.- रविंद्र चव्हाण ( सार्वजनिक बांधकाम मंत्री ) Dombivli Ravindra Chavan Navratri Ustav

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0