मुंबई
Trending

Navratri 2024 : भाजपा प्रदेश महासचिव विक्रांत पाटील यांच्या नवरात्र उत्सवास श्रेया बुगडे यांची विशेष उपस्थिती…

पनवेल : सध्या नवरात्र उत्सवाचे Panvel Navratri Ustav 2024 आनंदीमय वातावरण आणि नागरिकांमध्ये देखील उत्साह खूप मोठ्या प्रमाणात असल्याने नागरिक सध्या विविध कार्यक्रमात व्यस्त असल्याचे दिसते अशातच पनवेल येथे भाजपा प्रदेश महासचिव विक्रांत पाटील Vikrant Patil यांनी आयोजित केलेल्या नवरात्र उत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या नव दिवस चालणाऱ्या नवरात्र उत्सवास चला हवा येऊद्या फेम श्रेया बुगडे यांनी हजर राहत नागरिकांची मने जिंकली यावेळी बोलताना श्रेया बुगडे Shreya Bugde म्हणाली की विक्रांत दादांचे कार्य हे आम्हा सर्वांनाच भावणारे आहे

कारण सर्वांसाठी विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याप्रसंगी विजेत्या स्पर्धकांना श्रेया यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले व सर्व महिलांसोबत गरबा दांडिया कार्यक्रमात देखील सहभागी झाल्या यासह पाककला स्पर्धा, टाकाऊ पासून टिकाऊ स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पणती रंगवणे स्पर्धा, ट्रेजरहंट, कोण होणार गरबा स्टार स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी विक्रांत पाटील यांनी सहभागी होत विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण केले. व ‘माझा प्रभाग माझा परिवार’ ह्या वाक्या प्रमाणे जनतेला परिवारातील सदस्य मानून सर्व स्पर्धा व कार्यक्रम या दोन दिवसात संपन्न झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0