क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Thane Crime Branch News : ठाण्यात शिक्षणाच्या छायेत ‘तंबाखूचा साठा’! – गुन्हे शाखेच्या धडकेत शाळेजवळच्या गोदामातून 5.20 लाखांचा ‘गुटखा’ जप्त; आरोपी फरार

Thane Police Latest Crime News : खंडणी विरोधी पथकाकडून मोठी कारवाई; अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या आरोपीचा शोध सुरू

ठाणे :- एका बाजूला विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जातात आणि दुसऱ्या बाजूला त्याच शाळेच्या अगदी जवळच्या खोलीत महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेल्या गुटख्याचा मोठा साठा केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात उघड झाला आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अत्यंत गोपनीय माहितीच्या आधारावर ही धडक कारवाई केली आणि सुमारे 5 लाख 20 हजार 670 रुपये किंमतीचा सुगंधी गुटखा जप्त केला आहे. Thane Police Latest News

गुन्हे शाखेला Thane Crime Branch ठाणे मनपा शाळा, मोघरपाडा, ओवळा, ठाणे येथील एका खोलीत अवैध गुटख्याचा साठा विक्रीसाठी ठेवल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पथकाने लगेचच शाळेजवळ असलेल्या खोली क्रमांक 2 आणि 3 येथे छापा टाकला.

या छाप्यात आरोपी सुशील कुमार रामनरेश गुप्ता याने महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला सुगंधी पानमसाला, गुटखा आणि तंबाखू माल विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी हा संपूर्ण माल जप्त केला असला तरी, मुख्य आरोपी सुशील गुप्ता मात्र पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तो घटनास्थळावरून फरार झाला असून, खंडणी विरोधी पथक त्याचा कसून शोध घेत आहे.

या गंभीर प्रकरणी कासारवडवली पोलीस स्टेशन Kasarwadwali Police Station येथे भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0