मुंबई

Navi Mumbai Breaking News : दिवाळीपूर्वी नवी मुंबईत स्फोट, 3 ठार, 2 जखमी

Navi Mumbai News : नवी मुंबईत दिवाळीच्या पूर्वसंध्येला पेट्रोल स्टोरेज रूममध्ये झालेल्या स्फोटात तिघांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. मृत दोघेही एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात येत आहे.

नवी मुंबई :- दिवाळीच्या पूर्वसंध्येला नवी मुंबईतील उलवे Navi Mumbai Ulve येथे बेकायदेशीररीत्या साठवलेल्या पेट्रोलच्या स्टोअर रूममध्ये Petrol Store Room fire News झालेल्या स्फोटात तिघांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, स्टोअर रूममध्ये ड्रम आणि गॅलनमध्ये बेकायदेशीरपणे पेट्रोल गोळा केले जात होते.बुधवारी सायंकाळी पेट्रोलचे गॅलन आणि ड्रम फुटले. प्राथमिक माहितीनुसार, तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.

अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार बेकायदेशीरपणे पेट्रोल गोळा करून त्याची विक्री केली जात होती.

स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. आई आणि दोन मुलांचा मृत्यू झाला तर वडिलांची रमेश काची प्रकृती गंभीर आहे. पत्नी मंजू काची मुलगी लक्ष्मी काची मुलगा चेतन काची दिवाळीपूर्वी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला देशभरातील घरे विद्युत रोषणाईने उजळून निघाली होती. त्यानंतर नवी मुंबईत घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

38 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago