Navi Mumbai Firing News : नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील भाजीपाला बाजारातून कचरा उचलण्याच्या कंत्राट वरून वाद कंत्राटदारावर गोळीबार, दोन सराईत आरोपींना अटक, एका आरोपीच्या विरोधात 8 गुन्हे उघडकीस, दुसऱ्या आरोपीच्या विरोधात 3 गुन्हे उघडकीस
नवी मुंबई :- सानपाडा येथे एपीएमसीतील कंत्राटदार राजाराम एकनाथ टोके यांच्यावर डी मार्ट सेक्टर-10 येथे 3 जानेवारी च्या दरम्यान बेछूट गोळीबार करण्यात आला होता. Navi Mumbai Firing News या प्रकरणातील व्यक्तीला पुण्यातून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. एपीएमसीतील कचरा उचलण्याच्या कंत्राट वादातून हा गोळीबार करण्यात आला होता. याप्रकरणी सानपाडा पोलीस ठाण्यात Sampada Police Station भारतीय न्याय संहिता कलम 109,3(5), सह आर्म ॲक्ट 3,25 अशा गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
मिलींद भांरबे, पोलीस आयुक्त,संजय येनपुरे, पोलीस सह आयुक्त, दिपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), अमित काळे, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे) व पंकज डहाणे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-1 यांनी गुन्हयाचे घटनास्थळास भेटी देवुन संवेदनशील गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याकरीता मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या.
अमित काळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा व अजयकुमार लांडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हयाचे घटनास्थळावरील, आजुबाजुचा परिसर व दोन अनोळखी व्यक्तींना मोटार सायकलवरून घटनास्थळी येण्याचे व जाण्याचे मार्गावरील खाजगी व सरकारी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपास करण्याकरीता वेगवेगळी तपास पथके तयार केली.
खात्रीशीर बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून 10 जानेवारीच्या रोजी शिवाजीनगर, पुणे येथुन गुन्हयातील पाहिजे आरोपी संतोष उत्तम गवळी आणि 13 जानेवारी रोजी खेड-शिवापुर, पुणे येथुन फायरींग करणारा पाहीजे आरोपी इम्रान मुन्ना कुरेशी अशा आरोपींना गुन्हे शाखेतील पोलीस पथकाने ताब्यात घेवुन पुढील कारवाई करिता सानपाडा पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे.
आरोपींनी गुन्हयात वापरलेली चोरीची होंडा युनिकॉर्न मोटार सायकल व फायरींगसाठी वापरलेले गुन्हयाचे तपासादरम्यान हस्तगत करण्यात आलेले आहे.सराईत अटक आरोपी इम्राण मुन्ना कुरेशी हा मुंबई येथील 12 बंदुक जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांनी आरोपीचे सखोल चौकशी केली असता इम्रान मुन्ना कुरेशी याच्या विरोधात नवी मुंबई आणि मुंबईत आठ गुन्हे दाखल आहे.आरोपी संतोष उत्तम गवळी याच्या विरोधात तुर्भे आणि एपीएमसी पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहे.
पोलीस पथक
सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे अजयकुमार लांडगे यांचे मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास तुंगेणवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कोकरे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक निलम पवार, पोलीस उपनिरीक्षक संजय रेड्डी, पोलीस उपनिरीक्षक राहुल भदाने, पोलीस हवालदार शशिकांत शेंडगे, महेश पाटील, किरण राउत, संजय राणे, पोलीस नाईक सतिश चव्हाण, सचिन टिके, अजय कदम,राहुल वाघ,निलेश किंद्रे, पोलीस शिपाई नितीन परोडवाड, अशोक पाईकराव, महिला पोलीस शिपाई पुजा वैदय यांनी केली आहे.